पालघर'च्या पुनरावृत्ती'चा भाजपचा संकल्प 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 जून 2018

नाशिकः विधान परिषदेत भाजपकडे संख्याबळ नसल्याने महत्वाचे निर्णय विरोधकांकडून अडविले जातात. त्यासाठी विधान परिषदेत भाजपचे संख्याबळ वाढविण्याची गरज आहे. शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीत पालघरच्या निकालाची पुनरावृत्ती करण्याचा संकल्प पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सोडला. 

नाशिकः विधान परिषदेत भाजपकडे संख्याबळ नसल्याने महत्वाचे निर्णय विरोधकांकडून अडविले जातात. त्यासाठी विधान परिषदेत भाजपचे संख्याबळ वाढविण्याची गरज आहे. शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीत पालघरच्या निकालाची पुनरावृत्ती करण्याचा संकल्प पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सोडला. 

श्री पाटील यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी उत्सव मंगल कार्यालयात झालेल्या मेळाव्यात श्री महाजन बोलत होते. नगरचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे आणि पर्यटन राज्यमंत्री जयकुमार रावल, खासदार हरीचंद्र चव्हाण, आमदार सीमा हिरे, देवयानी फरांदे, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष केदा आहेर, महापौर रंजना भानसी, स्थायी सभापती हिमगौरी आहेर, उदय वाघ, बबन चौधरी, भानुदास बेरड, दिनकर पाटील, संभाजी मोरुसकर, आदीसह भाजप नगरसेवक उपस्थित होते. 

    श्री महाजन म्हणाले की, विधान परिषदेत बहुमताअभावी भाजपला अनेक चांगले निर्णय घेण्यात कॉग्रेस-राष्ट्रवादीकडून अडचणी येतात. त्यामुळे विधान परिषदेत बहुमत वाढविण्यासाठी भाजपने नाशिकच्या शिक्षक मतदार संघाची जागा प्रतिष्ठेची केली आहे. पालघर लोकसभा मतदार संघात भाजपने मोठ्या फरकाने विजय मिळविला. नाशिक शिक्षक मतदार संघात पालघरच्या निकालाची पुनरावृत्ती पहायला मिळेल, नाशिकच्या विजयाने भाजपचा विधान परिषदेत बहुमताचा आकडा वाढेल. असा दावा केला. 

प्रा. शिंदे म्हणाले की भाजपचे विधान सभेत बहूमत आहे. मात्र विधान परिषदेत बहूमत नाही , विरोधक जनहिताच्या विधेयकाला विरोध करतात, विधेयक पास होऊन देत नाही त्यामुळे चांगले निर्णय घेऊन देखील त्याचा उपयोग होत नाही. याकरिता निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लावावी,असे आवाहन त्यांनी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्याना केले.

  श्री रावल यांनी भाजपची शक्ती आणि संघटन नाशिकसह अहमदनगर , नंदुरबार , जळगांव आणि धुळे जिल्ह्यात असून पक्षाचे सत्ता असतांना महत्त्वाचे निर्णय घेतले आहे, त्यामुळे भाजपचा विजय निश्‍चित होईल, असा दावा केला. 

केंद्र व राज्यातील भाजप सरकारने केलेल्या विकास कामांवर शिक्षकांचा विश्वास आहे त्यामुळे शिक्षक मतदारसंघात भाजपला यश मिळेल . 
-अनिकेत पाटील (भाजप उमेदवार) 
 

Web Title: marathi teacher election melava