मराठवाड्याच्या हक्काचं पाणी संघर्ष करून मिळवलं; मुख्यमंत्री फडणवीस यांचा दावा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 एप्रिल 2018

मराठवाड्यातील पळवलेलं हक्काचं पाणी संघर्ष करून परत मिळवलं आहे.“ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी केले.

लोहा - “प्रगतीचं पहिलं काम रस्ते विकास व रेल्वेमार्ग असते. 25 वर्षापासून रखडलेली ही कामे सरकारने प्राधान्याने हातात घेतली आहेत. मराठवाड्यातील पळवलेलं हक्काचं पाणी संघर्ष करून परत मिळवलं आहे.“ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी केले.

लोहा (जि. नांदेड) येथे तीन राष्ट्रीय महामार्गांच्या भूमिपूजन सोहळ्यात ते बोलत होते. गुरूवारी (ता. 19) सकाळी बारा वाजता नेट इलेक्ट्रॉनिक कळ दाबून या रस्त्यांचे भूमिपूजन झाल्याचे जाहिर करण्यात आले. प्रारंभी खारीक खोबऱ्याच्या हाराने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, लातूरचे खासदार सुनील गायकवाड, ज्येष्ठ भाजप नेते व माजी खा. भास्करराव पाटील खतगावकर, कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, लोह्याचे आ. प्रताप पाटील चिखलीकर, मुखेडचे आमदार डाॅ. तुषार राठोड, विनायकराव पाटील, सुधाकर भालेराव माजी आमदार ओमप्रकाश पोखर्णा जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर, माजी आमदार किशनराव राठोड, गणेश हाके, गेविंदराव केंद्रे आदिंची उपस्थिती होती. 

पुढे बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले, ”दमनगंगा प्रकल्पात मराठवाड्याला हक्काच्या 14 टीएमसी पाण्यापासून वंचित रहावे लागले. त्यातील  सात टीएमसी पाणी संघर्ष करून परत मिळवलं आहे. या भागात यापुढे 50 टीएमसी पाण्याची गोदावरी खोऱ्याची तूट भरून काढण्यात येणार आहे.''

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Marathwadas water was fought by the struggle says chief minister Fadnavis