‘रोख की चेक’ची कोंडी सोडवण्यासाठी बाजार समिती सभापतींची बैठक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 मे 2018

सहाय्यक निबंधक, विविध पक्ष यांची भूमिका जाणून घेण्यासाठी सदर बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

नांदगाव - गेल्या आठ दिवसांपासून ‘रोख की चेक’ ची कोंडी सुटत नसल्याने, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक, व्यापारी असोसिएशन व सर्व पक्षीय, सामाजिक संस्था यांची उद्या (दि. 10 मे) सकाळी 11 वाजता बाजार समितीच्या कार्यालयात बैठक बोलावण्यात आली आहे. बाजार समितीचे सभापती तेज कवडे यांनी ही बैठक बोलावली आहे. 
 
शेतमाल विक्रीचे पेमेंट रोख स्वरूपात अदा करणेबाबतचा निर्णय संचालक मंडळाने घेतला असून रोख स्वरूपात पेमेंट करण्यास व्यापारी वर्गाने असमर्थता दर्शवलेली असल्याने 2 मे 2018 पासून लिलाव बंद आहेत. 
 
सहाय्यक निबंधक, विविध पक्ष यांची भूमिका जाणून घेण्यासाठी सदर बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. कोंडी सुट्ण्यासाठी बाजार समिती संचालक मंडळाने प्रथमच राजकीय व सामाजिक संस्थांना साद घातली असून या सर्वांचा कौल घेण्याचा मानस संचालक मंडळाने व्यक्त केला आहे. 
 
पोलिस निरीक्षक, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आर. पी. आय, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आम आदमी पक्ष, प्रहार संघटना यांना निमंत्रण देण्यात आले आहे.  

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Market committee chairmakers sit for the cash or check