esakal | धाडीत जप्त केलेली दारू चक्क पोलिसांनीच विकली दुसऱ्याला
sakal

बोलून बातमी शोधा

police

धाडीत जप्त केलेली दारू चक्क पोलिसांनीच विकली दुसऱ्याला

sakal_logo
By
धनराज माळी


नंदुरबार : विविध गुन्ह्यांमध्ये जप्त दारू( Seiz Alcohol) नष्ट करण्याऐवजी चक्क एका दारू दुकानदाराला विक्री केल्याचा झिंगाट कारनामा उपनगर पोलिसांनी केल्याचे बोलले जात आहे. एलसीबीच्या पथकाने धाड टाकल्यानंतर कारवाई केल्याचा शेरा दारूच्या खोक्यांवर आढळल्याने उपनगर पोलिसांचे (Nandurbar Suburban Police) बिंग फुटले आहे. याप्रकाराची एकच चर्चा सुरू असून, याप्रकरणी पोलिस निरीक्षकांसह एका कर्मचाऱ्याला मुख्यालयात जमा करण्यात आले आहे.

(police operation alcohol seized during another alcohol sold seller)

हेही वाचा: दोंडाईचाला ऑक्सिजन सिलिंडरच संपल्याने तीन जणांचा मृत्यू !

नंदुरबार स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने (Nandurbar Local Crime Investigation Branch) दोन दिवसांपूर्वी संबंधित दुकानावर टाकलेल्या धाडीप्रसंगी दारूचे खोके आढळले. संबंधित खोक्यांवर उपनगर पोलिसांच्या कारवाईचे शेरे दिसून आले. यामुळे धाड टाकण्यासाठी गेलेल्या पथकातील कर्मचारीही अचंबितच झाले. त्यांनी सदरचा प्रकार वरिष्ठांना कळविल्यानंतर उपनगर पोलिसांचे बिंग फुटले. याप्रकरणी तातडीने पोलिस निरीक्षक नंदवाळकर व पोलिस कॉन्स्टेबल सरदार यांना मुख्यालयात जमा केले आहे. याप्रकरणी चौकशी सुरू असून, अहवालानंतर संबंधित दोषी आढळल्यास कारवाई करणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

हेही वाचा: दिलासादायक ! जळगावची पॉझिटिव्हिटी राज्यात सर्वांत कमी


विविध गुन्ह्यांमध्ये जप्त केलेली दारू नष्ट करण्यासाठी काढली असता, ती दुसऱ्याला दिली. संबंधित दारूसाठा एलसीबीच्या पथकाने जप्त केला. याप्रकरणी एका पोलिस अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यास मुख्यालयात जमा केले असून, चौकशी सुरू आहे.
-सचिन हिरे, उपविभागीय पोलिस अधिकारी, नंदुरबार

(police operation alcohol seized during another alcohol sold seller)