लस घेण्याला प्रतिसाद..मात्र ऑनलाइन रजिस्ट्रेशनमूळे घोडे अडले !

नेर गावाच्या चौकटीत शिरपूर येथील पिनकोड दाखविण्यात येत असल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम होतं आहे.
लस घेण्याला प्रतिसाद..मात्र ऑनलाइन रजिस्ट्रेशनमूळे घोडे अडले !

नेर ः येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात (Primary Health Center) लसीकरण (Vaccination) करून घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.परंतु गर्दी करूनही अनेकांना याचा फायदा झाला नाही. सध्या प्रशासनाच्या नियमानुसार लसीकरण करून घेण्यासाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन (Online registration) करून घेणे बंधनकारक असल्याने या ठिकाणी गावातील नागरिकांपेक्षा बाहेर गावातील नागरिकांनी लसीकरण करण्यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केल्याची संख्या जास्त दिसत आहे.

(villagers corona vaccine desire but register online problem)

लस घेण्याला प्रतिसाद..मात्र ऑनलाइन रजिस्ट्रेशनमूळे घोडे अडले !
तापीचे बॅक वॉटर फुलविणार सहा हजार हेक्टरवरील शेती

यामुळे येथील डॉक्टर(doctor) व कर्मचाऱ्यांना फार मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. परंतु लसीकरण करून घेण्यासाठी ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद दिसत आहे.काही ग्रामस्थांना ऑनलाइन रजिस्ट्रेशनची माहिती परिपूर्ण नसल्यामुळे मोठी फजिती होत आहे. यासाठी तेथील डॉक्टर व कर्मचारी यांना काम करण्यास जिकिरीचे ठरत आहे.यामुळे तात्काळ आरोग्य अधिकारी डॉ.सुनिल महाले यांनी वरिष्ठ अधिकारी यांना दूरध्वनीद्वारे कळविले असता. सूचनेप्रमाणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बाहेर सूचना फलक लावण्यात आले. सूचना फलकावर नमूद करण्यात आले की, प्रशासकीय नियमाप्रमाणे ऑनलाईन नोंदणी केलेल्या नागरिकांनाच ही लस देण्यात येईल.या सूचनेनुसार सदर गर्दीतील नियमात बसणाऱ्या साधारणतः दहा ते बारा नागरिकांना ही लस देण्यात आली. यावेळी उर्वरित नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. म्हणून येथील नागरिकांनी "माझी लस माझ्या गावी" हा उपक्रम राबवावा अशी प्रशासनाला विनंती केली आहे.

लस घेण्याला प्रतिसाद..मात्र ऑनलाइन रजिस्ट्रेशनमूळे घोडे अडले !
धुळ्यातील ८३ गावे जल जीवन मिशनमध्ये

ऑनलाईन रजिस्ट्रेशनमधील चूक

येथील नागरिकांना मोबाईल ॲपद्वारे लसीकरण नोंदणी करतांना मोठया अडचणी येत आहेत.यात राज्य निवडतांना जिल्हा निवडावा लागतो. तदनंतर आपल्या गावाचा पिनकोड नमूद करावा लागत असतो. परंतु नेर गावाचा पिनकोड याठिकाणी येत नसल्याचे येथील नागरिकांनी सांगितले आहे. ही चूक संकेतस्थळाची असल्याचे समजते आहे. नेर गावाचा पिनकोड चुकीचा दाखविला जात आहे. त्याठिकाणी नेर गावाच्या चौकटीत शिरपूर येथील पिनकोड दाखविण्यात येत असल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम होतं आहे.यासाठी ऑनलाइन नोंदणी करण्यास नागरिकांना अडचणी येत आहेत.

"माझी लस माझ्या गावी" हा उपक्रम राबवून गावातील अज्ञात नागरिकांना या लसीकरणाचा मोठा फायदा होईल.लसीकरण करून घेण्यासाठी बाहेर गावातील नागरिकांनी माझ्या नेर गावात आधीच ऑनलाईन नोंदणी केलेली असल्यामुळे गावातील नागरिक या लसीपासून वंचित होत आहेत.ऑनलाईन नोंदणी करणे आम्हाला शक्य होत नाही. यामुळे लसीकरण करून घेण्यासाठी गावातील नागरिक वंचित होतील. प्रशासनाने ऑफलाइन नोंदणी सुरू करावी.तसेचलसीकरण करण्यात यावे अशी मी प्रशासनाला विनंती करतो.

- नामदेव बाबुलाल बोरसे, ग्रामस्थ नेर

लस घेण्याला प्रतिसाद..मात्र ऑनलाइन रजिस्ट्रेशनमूळे घोडे अडले !
धुळ्यात माणुसकीचे धान्य कोठार

शासनाच्या नियमानुसार व वरिष्ठांच्या आदेशान्वये ऑनलाइन नोंदणी झाल्याशिवाय अद्याप प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण केले जाणार नाही. यासाठी लसीकरण करून घेण्यासाठी आलेल्या नागरिकांनी आरोग्य केंद्रात अरेरावी करू नये.येथील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात विना कारणास्तव गर्दी करू नये.नागरिकांनी तोंडाला मास्क लावावे व शारीरिक अंतर ठेवावे.

डॉ. सुनील महाले, प्राथमिक आरोग्य केंद्र नेर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com