मतदार संघात एक आदर्श, एक  महिला मतदान केंद्राची निमिर्ती 

मतदार संघात एक आदर्श, एक  महिला मतदान केंद्राची निमिर्ती 

मतदार संघात एक आदर्श, एक 
महिला मतदान केंद्राची निमिर्ती 

जळगावः विधानसभा मतदार संघनिहाय एक आदर्श, एक महिला मतदान केंद्र तयार करणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी "सकाळ'ला दिली. मतदारांनी अधिकाधिक संख्येने मतदानासाठी यावे यासाठी मतदारांसाठी सेल्फी पॉइंट ठेवले जातील. मतदारांनी मतदान केले की त्याठिकाणी येऊन सेल्फी काढतील. यासाठी सेल्फी पॉंईट आकर्षकरित्या सजविला जाईल. 

महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती 
निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदार संघात एक आदर्श व एक महिला मतदान केंद्र तयार करण्यात येणार आहे. महिला मतदान केंद्रावर सर्व कर्मचारी महिला असतील. आदर्श मतदान केंद्राची इमारत, फर्निचरबरोबरच मतदानाविषयीच्या सूचना, चिन्ह, खुणा व लोगो हे डिसप्ले बोर्डवर दाखविण्यात येणार आहे. 

प्रतिक्षा कक्ष अन पाळणाघरही 
मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांचे संपर्क क्रमांक, मतदारांना आवश्‍यक असलेल्या वीज, पाणी, शौचालय, प्रथमोपचार पेटी, व्हीलचेअर, मतदान केंद्रावर गर्दी असल्यास मतदारांसाठी प्रतिक्षाकक्ष, तान्हाबाळांसाठी पाळणाघर, सेल्फी पॉंईट, मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांसाठी एकसारखा युनिफॉर्म (ड्रेसकोड), मतदारांच्या प्रतिक्रिया नोंदणी फॉर्म आदी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. विविध सेवाभावी सामाजिक संस्था, स्काऊट गाईडची मुले, स्वयंसेवकांची मदत घेणार आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com