मेट्रोची घोषणा नाशिककरांसाठी मृगजळ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 ऑक्टोबर 2018

नाशिक - नागरी भागात एखादा प्रकल्प उभा करायचा झाल्यास सल्लागार संस्थेकडून प्रथम सर्वेक्षण करून घेतले जाते. नंतर प्रकल्प अमलात आणायचा की नाही, याचा निर्णय होतो. नाशिक शहरात सार्वजनिक वाहतुकीबाबत अर्बन मास ट्रान्स्पोर्ट कन्सल्टंट (यूएमटीसी) संस्थेने केलेल्या पाहणीत मेट्रोचा पर्याय व्यवहार्य नसल्याचा निर्वाळा महापालिकेला दिला आहे. विशेष म्हणजे महापालिकेने शासनाला अहवाल सादर केला असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये मेट्रो सुरू करण्याची केलेली घोषणा केवळ मृगजळ ठरण्याची दाट शक्‍यता आहे.

गेल्या महिन्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी जिल्ह्याचा धावता दौरा केला. दौऱ्यात शहरातील विकासकामांचा आढावा घेतला. नंतर मुख्यमंत्र्यांनी शहरात मेट्रो सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला होता. महामेट्रोमार्फत तांत्रिक व्यवहार्यता तपासून सिडकोच्या माध्यमातून सेवा उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. मुख्यमंत्र्यांच्या आश्‍वासनानंतर नाशिककरांना विकासाचे आणखी एक स्वप्न समोर दिसत असले, तरी २०१५ मध्ये झालेल्या एका सर्वेक्षणाचा अहवाल समोर आला आहे. तत्कालीन महापालिका आयुक्त डॉ. गेडाम यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर काम करण्यासाठी दिल्लीस्थित यूएमटीसी (अर्बन मास ट्रान्स्पोर्ट कन्सल्टंट) या सल्लागार कंपनीला सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेबाबत व्यवहार्यता अहवाल सादर करण्याचे काम दिले होते. संस्थेने शहर वाहतूक व्यवस्था भक्कम करण्यासाठी बससेवा हाच उत्तम पर्याय दिला होता. याच अहवालात बस रॅपिड ट्रान्स्पोर्ट सिस्टिम (बीआरटीएस) व मेट्रो सर्वेक्षणाचाही समावेश होता. त्यात मेट्रोचा पर्याय व्यवहार्य नसल्याचे स्पष्ट नमूद केले होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी मेट्रोची केलेली घोषणा निवडणुकीच्या तोंडावर मृगजळ ठरणार नाही ना, अशी शंका व्यक्त होत आहे.

मेट्रो अव्यवहार्यच
नाशिक शहरातून पूर्वी पाटबंधारे विभागाचे दोन कालवे गेले होते. साधारण चाळीस किलोमीटर अंतर असलेले कालवे महापालिकेकडे हस्तांतरित केले आहेत. हे कालवे बुजवून त्यावर मेट्रो रेल्वे चालवावी, अशी मागणी नगरसेवकांची आहे. आतापर्यंत मेट्रोसाठी अंदाजपत्रकात एक कोटीची तरतूद केली जात होती. त्या वेळीही नाशिककरांना मेट्रोचे स्वप्न दाखविण्यात आले होते. मात्र, शहराच्या कुठल्याही भागात रिंग रोडच्या माध्यमातून अर्धा ते एक तासात पोचणे शक्‍य असल्याने मेट्रोची प्रखरपणे मागणी पुढे येण्यासाठी अजून बराच कालावधी असल्याचे जाणकार म्हणतात.

Web Title: Metro Issue in Nashik