धुळे- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेंतर्गत जिल्ह्यातील ३६५ ग्रामपंचायत क्षेत्रांत कृषी, रस्ते, वने, ग्रामपंचायत, मृद व जलसंधारण, वनीकरण आदी विभागांची कामे सध्या सुरू आहेत. त्यामुळे हजारो हातांना रोजगार उपलब्ध झाला आहे. जिल्ह्यात १८ हजार कुटुंब जॉबकार्डधारक आहेत. त्यातील ४० हजार १२१ सदस्यांना जॉबकार्ड (कार्यपत्रिका) वितरित करण्यात आले आहेत.