कोजागरीनिमित्त दूधही महागले.. 

kojagiri milk.jpg
kojagiri milk.jpg

नाशिक : कोजागरी पौर्णिमेचा चंद्र आटवलेल्या केशर दुधात पाहून ते प्राशन करण्यासाठी रविवारी (ता. १३) नागरिकांना एक लिटरसाठी ८०रुपये मोजावे लागले. कुटुंबीयांसह विविध मंडळे, ज्येष्ठ नागरिक संघ, भजनी मंडळे, युवक मंडळांतर्फे कोजागरी पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रम झाले. रात्री उशिरा चंद्राच्या शीतल छायेत ठेवलेल्या दुधाचा सहकुटुंब, मित्रांसह आनंद घेण्यात आला.

लिटरभर दुधासाठी ८० रुपये मोजावे लागले

दरम्यान, कोजागरीमुळे रविवारी भद्रकालीतील दूध बाजारात लिटरभर दुधासाठी ८० रुपये मोजावे लागले. मागणीपेक्षा पुरवठा कमी असल्याने सायंकाळी सातनंतर दूध शिल्लक नव्हते. याशिवाय विविध तबेल्यांमध्येही दूध घेण्यासाठी गर्दी उसळली. सायंकाळनंतर दुधाची कमतरता भासू लागल्यावर अनेकांनी विविध संस्थांचे पाकीटबंद दूध खरेदी करणे पसंत केले. सायंकाळी सातनंतर दूध बाजारात दूधच शिल्लक नव्हते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com