दोंडाईचा- जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांच्या आधुनिकीकरणासह पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी शासकीय निवासस्थाने बांधण्यात येतील, अशी ग्वाही पणन व राजशिष्टाचारमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दिली. दरम्यान, हरवलेल्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी पोलिस दलातर्फे विकसित करण्यात आलेल्या अनुशोध ॲपचे लोकार्पण त्यांच्या हस्ते झाले.