लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

जळगाव - कुऱ्हाडदे (ता. जळगाव) येथील सतरावर्षीय पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेण्यात आले होते. यासंदर्भात औद्योगीक वसाहत पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आल्यावर गेल्या दोन महिन्यांपासून संशयिताचा शोध सुरू होता. पोलिसांना अचूक माहिती मिळताच संशयिताच्या शोधार्थ पोलिसांनी पुणे गाठून रात्रीतून पीडित मुलगीसह संशयिताला ताब्यात घेत जळगावात आणण्यात आले. वैद्यकीय तपासणीअंती संशयीत तरुणाला जिल्हा न्यायालयात हजर करण्यात येऊन त्याची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली. 

कुऱ्हाडदे परिसरातील अल्पवयीन जान्हवीला (नाव काल्पनिक) रूपेश नाना ऊर्फ ज्ञानेश्‍वर सपकाळे (वय १८) याने लग्नाचे आमिष दाखवत ११ ऑक्‍टोबरला पळवून नेले होते. गेले दोन महिने पीडितेचा शोध सुरू असतानाच औद्योगीक वसाहत पोलिस ठाण्याचे निरीक्षक रणजीत शिरसाठ यांना मिळालेल्या माहितीवरून त्यांनी उपनिरीक्षक योगेश शिंदे, बाळू पाटील, सचिन देशमुख, संदीप पाटील यांच्या पथकाने पुण्याकडे धाव घेतली. पुण्यातील शिकरापूर गावातील बजरंगवाडीत भाड्याने खोली घेऊन रूपेश नाना ऊर्फ ज्ञानेश्‍वर कोळी राहत असल्याचे आढळल्यावर संशयितास पोलिसांनी अटक करून जळगावला आणले. 

पीडितेचा जबाब नोंदविल्यावर तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. वैद्यकीय तपासणी अहवालावरून २२ ऑक्‍टोबरला दाखल अपहरणाच्या गुन्ह्यातील कलम वाढविण्यात आले असून अत्याचार केल्याचे निष्पन्न झाल्याने संशयितास न्यायालयात हजर केले. न्यायालयाने २० डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

Web Title: Minor girl tortured on the marriage bait