विद्यार्थीनीची छेड काढल्याने शिक्षकाला चोप

राजेंद्र बच्छाव
शुक्रवार, 1 जून 2018

इंदिरानगर (नाशिक) : राणेनगर येथील सेंट फ्रान्सिस हायस्कूलचा शिक्षक सुनील कदम याच्या विरोधात इंदिरानगर  पोलिसांनी शाळेतील अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणे आणि बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा (पोस्को ) अंतर्गत गुन्हा दाखल केल्याने खळबळ माजली आहे.

याबाबत पोलिसांनी उपस्थित असलेल्या नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्च मध्ये 9 वी ची वार्षिक परीक्षा झाल्यानंतर आजपासून 10 वी चे नियमित वर्ग सुरू होणार होते. मात्र ही मुलगी शाळेत जायचे नाही असे सांगत रडू लागली. त्यामुळे पालकांनी तिला खोदून विचारले असता तिने धक्कादायक माहिती देत सांगितले की, सदर शिक्षक शाळा सुरू असताना मधल्या सुटीत 'तू मला आवडते, आय लव यु ,तू पण म्हण' असे म्हणत असे. घरी कुणाला सांगितले तर याद राख असे धमकावत देखील होता.

त्यामुळे या मुलीने ही बाब आता पर्यंत पालकांपासून दडवून ठेवली होती. पुस्तक बदलण्याच्या बहाण्याने सदर शिक्षक या मुलीच्या घरापर्यंत देखील पोचला होता. यंदा वर्ग शिक्षक म्हणून त्याचीच  नेमणूक झाली आहे असे कळल्याने ही विद्यार्थिनी घाबरली होती. आज अखेर तिने पालकांना खरा प्रकार सांगितल्यानंतर संतप्त पालकांनी आणि नातेवाईकांनी सदर शिक्षकाला शाळेत जाऊन बेदम चोप दिला. त्यामुळे एकच पळापळ झाली होती. दरम्यान पोलिसांनी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला असून सदर शिक्षकांचा शोध घेतला जात आहे .

Web Title: for misbehave with girl student teacher get beat