Mission Indradhanush 2023 : ऑगस्टपासून 3 फेऱ्यांमध्ये मिशन इंद्रधनुष्य ५.० कार्यक्रम

Mission Indradhanush 5 0 program in 3 rounds from August nandurbar news
Mission Indradhanush 5 0 program in 3 rounds from August nandurbar newsesakal
Updated on

Mission Indradhanush 2023 : बालकांमधील मृत्यू व आजारपणाचे प्रमाण कमी करण्यासाठी लसीकरण हे एक प्रभावी साधन असून, नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात आढळून आले आहे, की अर्धवट लसीकरण झालेले, तसेच लसीकरण न झालेली बालके ही पूर्ण लसीकरण झालेल्या बालकांपेक्षा लवकर आजारी पडतात किंवा मृत्यू पावतात. (Mission Indradhanush 5 0 program in 3 rounds from August nandurbar news)

त्यामुळे केंद्र शासनाने डिसेंबर २०२३ पर्यंत गोवर रूबेला आजाराच्या दुरीकरण करण्याचे ध्येय निश्चित केले असून, यासाठी केंद्र शासनाने ऑगस्ट महिन्यापासून तीन फेऱ्यांमध्ये विशेष मिशन इंद्रधनुष्य ५.० कार्यक्रम राबविण्याचे निश्चित केले आहे.

विशेष मिशन इंद्रधनुष्य ५.० या मोहिमेंतर्गत झीरो ते दोन वर्ष वयोगटांतील लसीकरणापासून वंचित किंवा गळती झालेल्या लाभार्थ्यांचे सर्व लसीद्वारे लसीकरण करण्यात येणार आहे. दोन ते पाच वयोगटांतील ज्या बालकांचे गोवर रूबेला लसीचा पहिला व दुसरा डोस राहिला असेल, तसेच डीपीटी व ओरल पोलिओ लसीचा बूस्टर डोस राहिला असेल त्यांचेही लसीकरण करण्यात येणार आहे.

त्याचबरोबर गर्भवती महिला यांचे लसीकरण कार्यक्रमांतर्गत दिल्या जाणाऱ्या लसीद्वारे लसीकरण करण्यात येणार असून, ६ ऑगस्ट २०१८ किंवा त्यानंतर जन्मलेल्या बालकांचा यामध्ये समावेश करण्यात येणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Mission Indradhanush 5 0 program in 3 rounds from August nandurbar news
Nandurbar Employment Fair : पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे उद्या आयोजन

दरम्यान, विशेष मिशन इंद्रधनुष्य ५.० मोहीम ही पहिला महिना ७ ते १२ ऑगस्ट, दुसरा महिना ११ ते १६ सप्टेंबर तर तिसरा महिना ९ ते १४ ऑक्टोबरदरम्यान राबविण्यात येणार आहे.

या मोहिमेत मोठ्या प्रमाणात झीरो डोस, सुटलेले व वंचित राहिलेले लाभार्थी असलेले क्षेत्र, गोवर आजारासाठी अतिजोखमीचा भाग, नियमित लसीकरण कार्यक्रमांतर्गत नवीन लसींचा समावेश केल्यानंतर कमी काम असलेले क्षेत्र, जास्त दिवस नियमित लसीकरण सत्र न घेतलेले क्षेत्र, तसेच उपकेंद्राचे आरोग्यसेविकेचे पद तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी रिक्त असलेले क्षेत्र, स्थलांतरित होणारा भाग, गोवर-घटसर्प व डांग्या खोकला, २०२२-२३ या वर्षात उद्रेकग्रस्त भाग, लसीकरणास नकार देणारे व प्रतिसाद न देणारे क्षेत्र यात विशेष मेहनत घेतली जाणार असून, यात लसीकरण करून घेण्यात येणार आहे.

आजचे बालक उद्याचे भविष्य असून, त्यामुळे आपले बालके निरोगी व सुदृढ राहण्यासाठी आरोग्याच्या दृष्टीने नियमित लसीकरण करणे गरजेचे आहे. कोणतेही बालक लसीकरणापासून वंचित राहू देऊ नका, असे आवाहन तळोदा तालुका आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

Mission Indradhanush 5 0 program in 3 rounds from August nandurbar news
Dhule Police Transfer : हेमंत पाटलांची तडकाफडकी बदली; आयजी एसपींमधील शीतयुद्धाचे जिल्ह्यात कारवाईतून पडसाद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com