Ration Card Holders
sakal
धुळे: सार्वजनिक वितरण प्रणाली अधिक पारदर्शक करण्यासाठी आणि खऱ्या गरजू लाभार्थ्यांपर्यंत हक्काचे धान्य पोहोचावे, या उद्देशाने राज्य सरकारने ‘मिशन सुधार’ अभियान हाती घेतले आहे. या मोहिमेंतर्गत धुळे जिल्ह्यात तब्बल एक लाख ८२ हजार २३२ संशयास्पद शिधापत्रिकाधारक प्रशासनाच्या रडारवर आले आहेत. परिणामी, मृत, दुबार आणि बोगस लाभार्थ्यांची नावे कायमस्वरूपी बाद करण्याची प्रक्रिया आता जिल्हा प्रशासनाने युद्धपातळीवर सुरू केली आहे.