आमदार किशोर पाटलांच्या मागण्या मान्य; उपोषण सुटले

kishor patil
kishor patil

भडगाव : तालुक्यातील 132 के.व्ही. सबस्टेशनच्या प्रश्नावर आज सकाळी साडेअकरा वाजल्यापासून पाचोरा मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार किशोर पाटील हे विधानभवनाच्या पायऱ्यांवर उपोषणाला बसले होते. उपोषणस्थळी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाऊन चर्चा केली. 132 के.व्ही. सबस्टेशनचे काम लवकर सुरू करू असे आश्वासन मंत्र्यांनी दिल्यानंतर आमदारांनी उपोषण मागे घेतले. 

भडगाव तालुक्यात 132 के.व्ही. सबस्टेशन नसल्याने शेतकऱ्यांना विविध प्रश्नांना सामोरे जावे लागते. 2008-09 वर्षात सबस्टेशनचा प्रस्ताव पाठविण्यात आला. त्याला 2010 मधे मंजुरी ही देण्यात आली. 2014 मधे वीज कंपनीने कोठली (ता. भडगाव) शिवारातील सबस्टेशनसाठी आवश्यक 10 एकर जागा ही रक्कम भरून ताब्यात घेतली. मात्र तरीही सबस्टेशनचे प्रत्यक्षात काम सुरू करण्याबाबत वीज कंपनी चलढकल करत आहे. उर्जा मंत्र्याच्या उपस्थितीत मुबंईला 8 वेळस अधिकाऱ्यांच्या बैठकाही झाल्या. मात्र तरीही वीज कंपनी 132 के.व्ही. सबस्टेशनसाठी हालचाल करत नाही. वरीष्ठ अधिकारी वास्तवाशी फारकत घेत याप्रश्नांकडे डोळेझाक करत आहेत. त्यामुळे आमदार किशोर पाटील यांनी आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर उपोषणाचा मार्ग अवलंबला.

सकाळी साडेअकरा वाजल्यापासून त्यांनी उपोषणाला प्रारंभ केला होता. दुपारी दिड वाजेच्या सुमारास राज्याचे ऊर्जामंत्री चद्रंशेखर बावनकुळे यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर उपोषणाला बसलेले आमदार किशोर पाटील यांची भेट घेतली. चर्चा करून उपोषण उपोषण सोडले. मंजुर 132 के.व्ही. सबस्टेशनचे लवकरच काम सुरू होईल असे आश्वासन मंत्र्यांनी दिले. त्यानंतर आमदारांनी उपोषण सोडले. यावेळी बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, चोपड्याचे शिवसेनेचे आमदार चंद्रकांत सोनवणे, अमळनेरचे आमदार शिरीष चौधरी हेही उपस्थितीत होते. 

उर्जामंत्र्यांनी स्वत: येऊन 132 के.व्ही. सबस्टेशन करण्याची मागणी मान्य केली. लवकरच त्याचे काम सुरू करू असे आश्वस्त केले आहे. तर 4 तारखेला यासंदर्भात बैठकही आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे उपोषण मागे घेतले
- किशोर पाटील आमदार पाचोरा-भडगाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com