Dhule News | चारशे कोटींचा निधी आणण्यात यश : आमदार रावल

Dondai: Sarpanch, deputy sarpanch along with MLA Jayakumar Rawal and BJP officials were felicitated in a program held at Rawal Gadhi on Saturday
Dondai: Sarpanch, deputy sarpanch along with MLA Jayakumar Rawal and BJP officials were felicitated in a program held at Rawal Gadhi on Saturdayesakal

धुळे : राज्यात अडीच वर्षांपूर्वी भाजप- शिवसेना युतीला स्पष्ट बहुमत मिळाले असतानाही उद्धव ठाकरे यांनी गद्दारी केल्याने अडीच वर्ष आपल्याला सत्तेच्या बाहेर राहावे लागले. अभद्र युती शिवसेनेच्या निष्ठावंत आमदारांना सहन झाली नाही.

त्यामुळे त्यांनी महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ सोडून सहा महिन्यांपूर्वी भाजपबरोबर सरकार स्थापन केले. यानंतर शिंदखेडा मतदारसंघात चारशे कोटींचा निधी आणण्यात यश‍ आले, असे माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल यांनी सांगितले. (MLA Rawal say Success in bringing funds of Four Hundred crores Benefits for Shindkheda Constituency Jalgaon News)

Dondai: Sarpanch, deputy sarpanch along with MLA Jayakumar Rawal and BJP officials were felicitated in a program held at Rawal Gadhi on Saturday
Nashik News : महापालिकेच्या वाहनांना डिझेल पुरविण्यास नकार

आमदार रावल, भाजपचे जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, सरचिटणीस कामराज निकम, भारत ईशी, पंचायत समिती उपसभापती रणजित गिरासे, जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र देसले, जिल्हा परिषद सदस्य वीरेंद्र गिरासे, पंकज कदम, डी. आर. पाटील, दादासाहेब रावल दूध संघाचे अध्यक्ष रघुवीर बागल, उपाध्यक्ष महेंद्र निकम, पंचायत समिती सदस्य प्रवीण मोरे, दुल्लभ सोनवणे, प्रकाश बोरसे, भाजपचे तालुकाध्यक्ष प्रा. रमेश खैरनार, शहराध्यक्ष प्रवीण महाजन, रवी उपाध्ये, नारायण गिरासे आदी उपस्थित होते.

अमळथे, आरावे, कळगाव, कुरूकवाडे, गोराणे, जोगशेलू, दराणे, निमगूळ, पाष्टे, रोहाणे, रामी, सतारे, वणी, वरसुस यासह साक्री तालुक्यातील बळसाणे, नागपूर आदी गावातील सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा नागरी सत्कार झाला.

दोंडाईचा येथील रावल गढीवर आमदार कार्यालयात शिंदखेडा मतदारसंघातील नवनिर्वाचीत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांसह विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या संचालक मंडळाचा शनिवारी (ता. १४) सत्कार झाला.

सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

Dondai: Sarpanch, deputy sarpanch along with MLA Jayakumar Rawal and BJP officials were felicitated in a program held at Rawal Gadhi on Saturday
Jalgaon News : लम्पीच्या नुकसानीपोटी पशुमालकांना 4 कोटी 78 लाख; पशुधन आठवडेबाजार पूर्ववत

विकासासाठी प्रयत्न

आमदार रावल म्हणाले, मतदारसंघातील अनेक गावांत आपल्याच कार्यकर्त्यांमध्ये लढत होते. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करा, असे आवाहन असते. अशा गावांना अनेक वर्षांपासून निधी देत असतो.

परंतु, काही गावांमध्ये एकमत होत नसल्याने तिथे निवडणुका होतात. तेथे विरोधक निवडणूक लावण्याचा प्रयत्न करतात. त्याकडे दुर्लक्ष करून अधिकाधिक गावविकास कसा होईल याकडे लक्ष द्यावे. सरकारकडून आवश्यक निधी मिळवून आणला जाईल. गल्लीपासून दिल्लीपर्यंत आता भाजपची सत्ता असल्याने सर्व गावांच्या विकासासाठी प्रयत्नशील असेल.

Dondai: Sarpanch, deputy sarpanch along with MLA Jayakumar Rawal and BJP officials were felicitated in a program held at Rawal Gadhi on Saturday
Nashik News : महापालिकेच्या वाहनांना डिझेल पुरविण्यास नकार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com