रस्ता दुरुस्तीसाठीचे आमदारांचे आंदोलन स्थगित

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

बोरद : नेत्रंग - शेवाळी महामार्गावरील तळोदा - अक्कलकुवा दरम्यानचा रस्त्याची दुरवस्था झाली आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवूनही दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे आमदार राजेश पाडवी यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. मात्र आज झालेल्या बैठकीत रस्ता दुरुस्तीचे आश्वाोसन मिळाल्याने ते स्थगित करण्यात आले आहे.

बोरद : नेत्रंग - शेवाळी महामार्गावरील तळोदा - अक्कलकुवा दरम्यानचा रस्त्याची दुरवस्था झाली आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवूनही दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे आमदार राजेश पाडवी यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. मात्र आज झालेल्या बैठकीत रस्ता दुरुस्तीचे आश्वाोसन मिळाल्याने ते स्थगित करण्यात आले आहे.

तळोदा - अक्कलकुवा तालुक्यात येणाऱ्या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे तीन ते चार व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत. माजी क्रीडामंत्री पद्माकर वळवी यांचे लहान बंधू सुधाकर वळवी यांचे देखील याच रस्त्यावर खड्ड्यांमुळे अपघात झाला असून त्यांना डोक्याला जबरदस्त दुखापत झाली आहे.

महिलांनी पेटवली दारुची तीन दुकाने

याबाबत मागील तीन महिन्यांपासून राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांशी वेळोवेळी भ्रमणध्वनीद्वारे संवाद साधून त्यांना याबाबत अवगत करण्यात आले आहे. मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यासाठी २७ जानेवारीस सोमावल येथे हजारो गावकऱ्यांचा उपस्थितीत आमदार पाडवी स्वतः रास्ता रोको आंदोलन करणार होते.

आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

तळोदा पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांच्या दालनात आज दुपारी चारला बैठक झाली. यावेळी राष्ट्रीय महामार्ग उपविभाग साक्रीचे अक्षय कांकरीया हे कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग, धुळे यांचे प्रतिनिधी म्हणून बैठकीत हजर होते.

यावेळी त्यांनी वरिष्ठांशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून बैठकीत झालेली चर्चा त्यांना कळवली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पंधरा ते वीस दिवसात महामार्गाच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्याचे आश्वासन दिले.तसे पत्र ई मेल द्वारे आमदार पाडवी यांना पाठविण्यात येईल, असे कांकरीया यांनी सांगितल्यानंतर आमदार पाडवी व त्यांचे कार्यकर्ते यांचे समाधान झाले.

भुसावळच्या भाजप नगरसेवकावर गुन्हा दाखल

त्यामुळे २७ जानेवारीचे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. यावेळी आमदार राजेश पाडवी, राष्ट्रीय महामार्ग उपविभाग साक्रीचे कार्यकारी अभियंता अक्षय कांकरीया, पंचायत समितीचे सभापती यशवंत ठाकरे, पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण, आमदारांचे स्वीय साहाय्यक विरसिंग पाडवी, किरण सूर्यवंशी, विठ्ठल बागले, प्रवीण वळवी, गोपी पावरा, प्रकाश वळवी आदी उपस्थित होते.

नेत्रंग - शेवाळी महामार्गाअंतर्गत तळोदा व अक्कलकुवा दरम्यान असलेल्या रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले आहे की, २० दिवसांत महामार्ग दुरुस्तीला सुरुवात करण्यात येईल. त्यामुळे २७ जानेवारीचे आंदोलन स्थगित करण्यात येत आहे. मात्र वेळेत काम सुरु झाले नाही तर आक्रमक पवित्रा घेत आंदोलन करण्यात येईल.

- राजेश पाडवी, आमदार, शहादा - तळोदा.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLAs agitation for road repair halted