जिल्ह्यातील आमदारांचे देव पाण्यात... 

mla.jpg
mla.jpg

नाशिक : "आमचं ठरलंय इथंपासून ते आमचं बिनसलंय'पर्यंतच्या सत्ताकारणाच्या प्रवासात राज्यात सध्या राजकीय अस्थितरतेचे वातावरण आहे. जो पक्ष सत्ता बनवेल ती कुठपर्यंत टिकेल याबाबत साशंकता असल्याने पुन्हा मध्यावधी निवडणुका लागू होण्याची शक्‍यता असल्याने याचा सर्वाधिक धसका पहिल्यांदा निवडून आलेल्या आमदारांनी घेतला आहे. पुन्हा निवडणूक झाल्यास शून्यापासून सुरुवात करावी लागणार असल्यास त्यांना परवडणारी नसल्याची भावना व्यक्त होत आहे. 

पुन्हा निवडणुका परवडणार नसल्याची भावना 

आठ नोव्हेंबरला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर विधानसभा विसर्जित झाली. कोणाचे सरकार येईल याबाबत अद्याप अनिश्‍चितता आहे. महायुती म्हणून भाजप व शिवसेनेने निवडणूक लढल्यानंतर महायुतीचे सरकार स्थापन होईल, अशी शक्‍यता होती; परंतु मुख्यमंत्री कोणाचा यावरून युतीत तेढ निर्माण झाली. भाजपला बहुमत सिद्ध करण्याची तारेवरची कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे मध्यावधी निवडणुका लागण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. या शक्‍य-अशक्‍यतेच्या पातळीवर मात्र शहर व जिल्ह्यात निवडून आलेल्या नवनिर्वाचित आमदारांत धास्ती निर्माण झाली आहे. त्याला कारण म्हणजे राजकीय स्थिती पूर्णपणे बदलली असून, मतदार पुन्हा स्वीकारतील का?, या प्रकारची अनामिक भीती सर्व आमदारांना सतावत आहे. त्यामुळे पुन्हा निवडणुका लागू नये यासाठी अनेकांनी देव पाण्यात ठेवले आहेत. 

नवनिर्वाचित आमदार धास्तावले 
शहरात पूर्व विधानसभा मतदारसंघातून भाजपचे ऍड. राहुल ढिकले, नांदगावमधून शिवसेनेचे सुहास कांदे, देवळाली मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सरोज आहिरे, इगतपुरी मतदारसंघातून कॉंग्रेसचे हिरामण खोसकर, कळवणमधून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नितीन पवार हे पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. निफाडमध्ये राष्ट्रवादीचे दिलीप बनकर दुसऱ्यांदा निवडून आले असले, तरी त्यांना दुसऱ्या विजयासाठी दहा वर्षे वाट पाहावी लागली. अशीच स्थिती सिन्नरचे विद्यमान आमदार ऍड. माणिकराव कोकाटे यांच्या बाबतीत आहे. कोकाटे यांना पुन्हा राजकीय अस्तित्व निर्माण करण्यासाठी झगडावे लागले. त्यामुळे सध्या निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीत नवनिर्वाचित आमदार धास्तावले आहेत. त्यापेक्षा काठावर निवडून आलेल्या आमदारांत पुनर्निवडणुकांची धास्ती आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com