Dhule Corona Update : ‘कोरोना’प्रश्‍नी आरोग्य यंत्रणा अलर्ट; राज्य शासनाला अहवाल

corona
coronaesakal

Dhule Corona Update : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर तयारीचा आढावा (Dhule News) घेण्यासाठी शहरासह जिल्ह्यातील सर्व शासकीय व खासगी रुग्णालयातील सज्जता पडताळणीसाठी मॉक ड्रिल झाले. (mock drill was conducted in background of increasing number of corona patients dhule corona update news)

त्यात रुग्णालयातील आयसीयू बेड्स, ऑक्सिजन सिलिंडर, मास्क, औषधी, मुबलक कर्मचारी संख्या आणि विविध सामग्री पुरेशी आहे की नाही याची पडताळणी झाली. शिवाय जिल्हा साथरोग नियंत्रण कक्षाकडून ही सर्व अद्ययावत माहिती शासनाला सादर करण्यात आली.

प्रतिबंधात्मक डोसची स्थिती

जिल्ह्यात बारा वर्षांपुढील १८ लाख ९७ हजार ६७७ नागरिकांपैकी १५ लाख १ हजार ६२० जणांनी पहिला, तर बारा लाख ४२ हजार २९ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच सरासरी ६५.४५ टक्के नागरिकांनी दोन्ही डोस घेतले आहेत. एक लाख ६० हजार १८५ नागरिकांनी बूस्टर डोस घेतला आहे. उद्दिष्टाच्या तुलनेत बूस्टर डोस घेण्याचे प्रमाण कमी आहे.

तथापि, जिल्ह्यातील १३ शासकीय रुग्णालयांसह जिल्हा परिषदेच्या ४६ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन आणि कार्बोव्हॅक्स या कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा एकही डोस शिल्लक नसल्याची स्थिती आहे. शहरातील विविध भागांत २० लसीकरण केंद्र सुरू होते. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर हे केंद्र बंद आहेत.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

corona
Nashik Jio Cinema Live : नाशिककर ‘आयपीएल फॅन पार्क’मध्ये अनुभवणार लाइव्ह सामान्यांचा थरार!

जिल्ह्यात सतर्कतेतून मॉक ड्रिल

कोरोनाच्या सद्य:स्थिती आणि संभाव्य परिणाम विचारात घेता आरोग्य यंत्रणेला अलर्ट करण्यात आले आहे. रुग्णसंख्या अचानक वाढल्यानंतर धावपळ होऊ नये, यासाठी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार नुकतीच जिल्ह्यातील आपत्कालीन परिस्थितीची माहिती करून देण्यात आली.

त्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने तयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्ह्यात सर्व शासकीय व खासगी रुग्णालयातील सज्जता पडताळणीसाठी मॉक ड्रिल करण्यात आले. रुग्णालयातील आयसीयू बेड्स, ऑक्सिजन सिलिंडर, मास्क, औषधी, मुबलक कर्मचारी संख्या आणि विविध सामग्री रुग्णालयात आहे की नाही, याची पडताळणी झाली. शिवाय जिल्हा साथरोग नियंत्रण कक्षाकडून ही सर्व अद्ययावत माहिती शासनाला सादर करण्यात आली.

शासनाकडे लशींची मागणी

सध्या जिल्ह्यात कोव्हॅक्सीन, कोव्हिशिल्ड लसींचा साठा शिल्लक नाही. आरोग्य उपसंचालकांना १७ मार्चला पत्र पाठवून ४० हजार लसींची मागणी नोंदविण्यात आली आहे. त्यात १५ हजार कोव्हिशिल्ड, १० हजार कोव्हॅक्सीन आणि १५ हजार कार्बोव्हॅक्स लसींचा समावेश आहे. अद्याप त्यांचा पुरवठा मात्र झालेला नाही. या आठवड्यात हा साठा उपलब्ध होणे अपेक्षित आहे.

"कोरोनाची वाढती रुग्णसंख्या विचारात घेता. आरोग्य यंत्रणेला अलर्ट करण्यात आले आहे. ऐनवेळी रुग्णसंख्या वाढल्यानंतर धावपळ होऊ नये यासाठी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार मॉक ड्रिल केले गेले. शिवाय अत्यावश्यक स्थिती हाताळण्यासाठी पुरेशा प्रमाणात मनुष्यबळाची उपलब्धता आहे. तसेच, औषधसाठादेखील पुरेशा प्रमाणात आहे." - डॉ. सचिन बोडके, माता व बालसंगोपन अधिकारी, धुळे

corona
Ramzan Eid 2023 : शिरखुर्म्याच्या गोडव्यास महागाईचा तडका; खरेदी- विक्रीवर परिणाम

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com