पैसे समजून पळविल्या बारावीच्या उत्तरपत्रिका

Theft
Theft

निलंगा - पैशांची बॅग समजून चोरट्यांनी बारावीच्या उत्तरपत्रिका पळविल्याची घटना निलंगा येथे घडली.

कळगाव (ता. निलंगा) येथील आनंद मुनी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात अन्य ठिकाणांहून बारावीच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी आल्या. प्राचार्य नंदकुमार केळगावकर यांनी तीन प्राध्यापकांकडे उत्तरपत्रिका सोपविल्या. त्यातील मराठी विषयाच्या ३० उत्तरपत्रिका तर रसायनशास्त्राच्या २५ उत्तरपत्रिका घेऊन दोन्ही प्राध्यापक सहकारी प्राध्यापकांच्या वाहनातून गुरुवारी (ता. १४) निलंग्यात आले. हॉटेलमध्ये चहा घेण्यासाठी गेले. तेवढ्यात चोरट्याने वाहनाची काच फोडून कापडी पिशव्या पळविल्या. पिशव्यांत नोटांचे गठ्ठे असावेत, या तर्काने चोरट्याने डल्ला मारला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com