असे लाटले पंतप्रधान मोदींच्या नावावर पैसे 

pune.jpg
pune.jpg

येवला : ''पोस्टात तुम्ही बचत खाते उघडा, तुमच्या बचत खात्यावर मोदी सरकार ५० हजार रुपये जमा करणार आहे,'' असे सांगून एका टोळीने गोरगरीब, आदिवासींचे अर्ज भरुन प्रत्येकी 150 रुपये पैसेही जमा केले. शहरातील नागरिक आणि पोस्ट कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे टोळक्याचे भांडे फुटले. ही टोळी फरार झाली असून त्यांना त्वरित ताब्यात घ्यावे अशी मागणी आज नागरिकांनी पोलिसांकडे केली आहे. 


शहरातील काळा मारुती रस्त्यावर पोस्ट खात्याचे मुख्य कार्यालयाजवळील रेणुका माता मंदिराच्या ओट्यावर सोमवारी अज्ञात टोळीतील लोकांनी टेबल लावले होते. येथे गोरगरिब,आदिवासी लोकांचे पोस्ट खात्याचे बचत खाते उघडण्याचे अर्ज भरून घेतले. पोस्टात बचत खाते उघडा, तूमच्या खात्यावर काही दिवसानंतर मोदी सरकार ५० हजार रुपये जमा करणार आहेत, असे सांगत ही टोळी संपूर्ण दिवसभर अर्ज भरून घेत होती. काही सजग नागरिकांनी ही गोष्ट १०० फुटांवर असलेल्या पोस्ट कार्यलयातील कर्मचाऱ्यांना जाऊन सांगितली. पोस्टातील कर्मचाऱ्यांनीही अर्ज भरून घेणाऱ्या लोकांना असे काहीही नसल्याचे सांगितले, मात्र लोभापोटी आलेले लोक ऐकण्यास तयार नव्हते. 

आजूबाजूच्या नागरिकांनीही त्यांना हटविण्याची प्रयत्न केला असता, ''आम्ही पोस्टाचे अधिकारी आहोत,'' असे सांगत त्यांनी दिवसभर अर्ज भरून घेतले. आज मंगळवारी पुन्हा सकाळी मोटरसायकलवर या टोळीचे सदस्य अर्ज भरण्यासाठी आले असता येथील पोस्टमास्तर, कर्मचारी आणि नागरिकांनी त्यांना अडवत पोलिसांशी संपर्क केला, मात्र पोलिस येण्यापूर्वीच ही टोळी पसार झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com