दुष्काळी भागात मॉन्सूनची सलामी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 जून 2016

नाशिक : मृग नक्षत्राच्या अंतिम दिवशी आज इगतपुरी, सिन्नर, निफाड, येवला, देवळा, चांदवड, नांदगाव, बागलाण तालुक्‍यांत मॉन्सूनने जोरदार हजेरी लावली. यामुळे दुष्काळी भागातील खरिपाची कामे मार्गी लागली आहेत. तर, नाशिक शहरात सलग दुसऱ्या दिवशी केवळ रिमझिम पाऊस झाला असून, शहरात गेल्या 36 तासांमध्ये 4.2 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

नाशिक : मृग नक्षत्राच्या अंतिम दिवशी आज इगतपुरी, सिन्नर, निफाड, येवला, देवळा, चांदवड, नांदगाव, बागलाण तालुक्‍यांत मॉन्सूनने जोरदार हजेरी लावली. यामुळे दुष्काळी भागातील खरिपाची कामे मार्गी लागली आहेत. तर, नाशिक शहरात सलग दुसऱ्या दिवशी केवळ रिमझिम पाऊस झाला असून, शहरात गेल्या 36 तासांमध्ये 4.2 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

विदर्भ व कोकणमार्गे महाराष्ट्रात प्रवेश करणारा मॉन्सून यंदा दमदारपणे उत्तरेकडे सरकत आहे. आज त्याचा नाशिक जिल्ह्यात प्रवेश झाला. सिन्नर, येवला, चांदवड, देवळा, नांदगाव, निफाड, इगतपुरी व बागलाण तालुक्‍यांत आज दुपारी दमदार पाऊस झाला. बागलाण व देवळ्यात काल (ता. 20)ही काही भागात पाऊस झाला होता. आजचा पाऊस सर्वदूर भागात कोसळला असून, शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. काही ठिकाणी बंधारे, तळ्यांमध्ये पाणीसाठा आल्यामुळे या भागातील खरिपाची कामे मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. यंदा चांगल्या पावसाच्या आशेने बळीराजाने खरिपाची तयारी केली; परंतु प्रत्यक्षात रोहिणी व मृग नक्षत्र कोरडे गेल्याने शेतकऱ्यांमध्ये नैराशाचे वातावरण पसरले होते. त्यात मॉन्सूनने विदर्भ, मराठवाडामार्गे महाराष्ट्रात प्रवेश केल्यामुळे हमखास पाऊस होणारे इगतपुरी, त्र्यंबकेश्‍वर, पेठ, सुरगाणा, दिंडारी, कळवण या तालुक्‍यांत पाऊस नसल्याने शेतीची कामे खोळंबली होती. गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. आज दुपारी मॉन्सूनच्या पावसाने जोरदार हजेरी लावली.
 

जिल्ह्यात आतापर्यंत 3.46 मिलिमीटर पाऊस
दिवसभर ढगाळ वातावरण व काही भागांत रिमझिम यामुळे जिल्ह्यात मंगळवारी सकाळी आठपर्यंत सरासरी केवळ 3.46 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पश्‍चिमेकडील अतिपावसाच्या तालुक्‍यांमध्ये अद्यापही पावसाची नोंद झालेली नाही.
 

जिल्ह्यातील पाऊस मिलिमीटरमध्ये (आज सकाळी आठपर्यंत)
नाशिक - 2.4
इगतपुरी - 3.0
दिंडोरी - 0
पेठ - 0
त्र्यंबकेश्‍वर - 1
मालेगाव - 2.0
नांदगाव - 3.0
चांदवड - 2.0
कळवण - 3.6
बागलाण - 14
सुरगाणा - 0
देवळा - 15
निफाड - 0
सिन्नर - 6
येवला - 0

Web Title: monsoon come drought areas

टॅग्स