मर्यादावाढीमुळे आणखी लाखभर शेतकऱ्यांना लाभ 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 जून 2019

 पंतप्रधान किसान सन्मान योजनेची मर्यादा वाढविल्याने जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या दीड लाखाने वाढण्याची आशा आहे. येत्या 30 जूनपर्यंत हे कामकाज पूर्ण करण्याचे नियोजन आहे. साधारण साडेचार लाख शेतकऱ्यांना योजनेचा लाभ शक्‍य आहे. 

नाशिक -  पंतप्रधान किसान सन्मान योजनेची मर्यादा वाढविल्याने जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या दीड लाखाने वाढण्याची आशा आहे. येत्या 30 जूनपर्यंत हे कामकाज पूर्ण करण्याचे नियोजन आहे. साधारण साडेचार लाख शेतकऱ्यांना योजनेचा लाभ शक्‍य आहे. 

जिल्ह्यात साधारण आठ लाख खातेदार आहेत. त्यांपैकी कुटुंबात शासकीय नोकरी नसल्यासह विविध अटींत बसणाऱ्या शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या लाभाची योजना आखली आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून हाती घेतलेल्या योजनेत पहिल्या टप्प्यात साडेआठ हजार शेतकऱ्यांना लाभ झाला. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने पुन्हा कामकाज थंडावले. मात्र, आता येत्या 30 जूनपर्यंत शेतकरी किसान सन्मान योजनेचे लाभार्थी निवडण्याचे निश्‍चित करण्यात आले आहे. त्यानुसार काही अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पूर्वीच्या साडेतीन लाख लाभार्थी संख्येत वाढ होण्याची आशा आहे. 

वेगाने माहितीचे अपलोडिंग 
प्रशासनाच्या नियोजनानुसार जिल्ह्यातील तीन लाख 50 हजारांवर शेतकरी खातेदार योजनेसाठी पात्र ठरले होते. त्यानुसार साडेआठ हजारांचा एक टप्पा याप्रमाणे प्रत्यक्ष खात्यात पैसे जमा होण्याची सुरवात झाली. सरसकट लाभ देण्याच्या मागणीनंतर अटी शिथिल करण्यात आल्यानंतर लाभार्थ्यांच्या संख्येत आणखी एक लाखाने वाढ होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे प्रतिदिन 17 हजार याप्रमाणे खातेदारांची माहिती अपलोड करण्याच्या कामाला गती आली. 

जिल्ह्यातील खातेदार आठ लाख 
पात्र खातेदार 4,50,000 
माहिती अपलोड झाली 3,50,000 
अपलोड व्हायची बाकी 1,48,000 
प्रतिदिन माहिती संकलन 17 हजार 

माहिती अपलोड करण्यास चांगली गती आली. प्रतिदिन 17 हजारांच्या सरासरीने माहिती अपलोड केली जाते. येत्या 30 जूनपर्यंत माहिती अपलोड करण्याचे कामकाज पूर्ण होईल. अशा गतीने कामकाज सुरू आहे. 
- सूरज मांढरे, जिल्हाधिकारी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: More than a million farmers benefit due to limitations