आई, मावशीसोबत मुलगीही बनली खिसेकापू

दीपक कच्छवा
रविवार, 9 डिसेंबर 2018

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : येथील आठवडे बाजारात काल (7 डिसेंबर) खिसे कापून चोरी करणाऱ्या तीन महिलांना येथील पोलिसांनी जेरबंद केले होते. त्यांची कसून चौकशी केली असता, त्या वर्धा जिल्ह्यातील असून सराईत चोर असल्याचे निष्पन्न झाले. पारोळा बस स्थानकातून सोन्याची 75 हजारांचे दागिणे चोरल्याची त्यांनी कबुली दिली. या घटनेचे "सीसीटीव्ही फुटेज' पोलिसाच्या हाती लागले आहे. दरम्यान, तिघा संशयित महिलांना न्यायालयात हजर केले असता, चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. 

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : येथील आठवडे बाजारात काल (7 डिसेंबर) खिसे कापून चोरी करणाऱ्या तीन महिलांना येथील पोलिसांनी जेरबंद केले होते. त्यांची कसून चौकशी केली असता, त्या वर्धा जिल्ह्यातील असून सराईत चोर असल्याचे निष्पन्न झाले. पारोळा बस स्थानकातून सोन्याची 75 हजारांचे दागिणे चोरल्याची त्यांनी कबुली दिली. या घटनेचे "सीसीटीव्ही फुटेज' पोलिसाच्या हाती लागले आहे. दरम्यान, तिघा संशयित महिलांना न्यायालयात हजर केले असता, चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. 

मेहुणबारे गावाचा काल (7 डिसेंबर) आठवडे बाजार होता. या बाजारात आजूबाजूच्या सुमारे 25 ते 30 खेड्यांमधील ग्रामस्थ बाजाराला येतात. दरेगाव (ता. चाळीसगाव) येथील नारायण महाजन हे देखील बाजारात आले होते. भाजीपाला खरेदी करत असताना त्यांच्या पॅन्टच्या खिशात कोणीतरी हात टाकल्याचा त्यांना संशय आला. त्यांनी लगेचच मागे फिरून पाहिले असता, एका महिलेने त्यांच्या खिशातून पैसे काढून लपविल्याचे लक्षात आले. या महिलेसोबत आणखीन दोन महिला असल्याने महाजन यांनी घडलेला प्रकार मेहुणबारे पोलिसांना कळविला. त्यानुसार, पोलिसांनी बाजारात येऊन संशयितरित्या फिरणाऱ्या इंदू आनंदा गायकवाड, कांता प्रेम गायकवाड व सोनी जगत राखडे (सर्व रा. अशोकनगर, वर्धा) यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांची महिला पोलिस हवालदाराने कसून चौकशी केली असता, तिघींनी बाजारात चोरलेले सहा हजार रुपये व मुद्देमाल पोलिसांना काढून दिला. 

पोलिसांची केली दिशाभूल 
पोलिस ठाण्यात आणलेल्या तिघा महिलांनी त्यांचा पत्ता चुकीचा सांगितला. हे सहाय्यक पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या लक्षात आल्याने त्या तिघांची स्वतंत्ररित्या सखोल चौकशी केली. त्यामुळे तिघेही खोटे बोलत असल्याचे लक्षात आले.पोलिसी खाक्‍या दाखवल्यानंतर त्यांनी पाच ते सहा जणांचे खिसे कापल्याचे सांगितले. यापूर्वीही त्यांनी येथील बाजारात अशा चोऱ्या केल्याचा पोलिसांचा संशय आहे. तिन्ही महिलांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना चाळीसगाव न्यायालयात हजर केले असता चार दिवसाची पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली. 

पारोळ्यातून दागिने लांबविले 
या तिन्ही संशयित महिला सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले. बुधवारी (5 डिसेंबर) पारोळा बस स्थानक परिसरातून 75 हजार रूपयांचे सोन्याचे दागिणे याच महिलांनी लंपास केले होते. या स्थानकावरील "सीसीटीव्ही फुटेज'मध्ये याच महिला असल्याचे निष्पन्न झाले. तशी त्यांनीही पोलिसांजवळ कबुली दिल्याचे श्री. हिरे यांनी सांगितले. 

आई, मावशीसोबत मुलगीही बनली खिसेकापू 
बाजारात गर्दीचा फायदा घेऊन खिसे कापण्यात निष्णात असलेल्या तिन्ही महिला एकमेकींच्या नातेवाईक आहेत. यात मुलीसह तिच्या आई व मावशीचा समावेश आहे. सुया पोत विकण्याचा त्यांचा व्यवसाय असल्याचे त्या असल्या तरी खिसे कापण्याचे ते कामे करतात. आई व मावशीने त्यांच्या मुलीला देखील चोरीच्या या व्यवसायात गुंतवले असून त्यांचे एक रॅकेट असावे, असा पोलिसांचा अंदाज अजून त्यादृष्टीने पोलिस तपास करीत आहेत. 

''सध्या आमच्या ताब्यात असलेल्या तिन्ही महिला सराईत दिसून येत आहे. त्यांनी भुसावळ, पारोळा, जळगाव व चाळीसगाव येथील बसस्थानक तसेच बाजारपट्टा भागात अनेक चोऱ्या केल्या आहेत. साधारणतः आठवड्यापासून तिन्ही आपल्या भागात सक्रीय झाल्या होत्या.''
- जयपाल हिरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, मेहुणबारे (ता. चाळीसगाव)

Web Title: Mother, along with Mawshi, daughter became a pusacapu