मोटारसायकल रॅलीद्वारे किडनीबाबत जनजागृती

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 मार्च 2017

जळगाव - रोटरी क्‍लब जळगाव व आरोग्यदीप फाउंडेशन यांच्यातर्फे जागतिक किडनी दिनानिमित्त आज जनजागृतीपर मोटारसायकल रॅली काढण्यात आली.

जळगाव - रोटरी क्‍लब जळगाव व आरोग्यदीप फाउंडेशन यांच्यातर्फे जागतिक किडनी दिनानिमित्त आज जनजागृतीपर मोटारसायकल रॅली काढण्यात आली.

रॅलीद्वारे किडनी आजाराबाबतचे गैरसमज यावर जनजागृती करण्यात आली.
रिंग रोडवरील आरोग्यदीप हॉस्पिटलपासून जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. बी. आर. पाटील यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीस सुरवात करण्यात आली. याप्रसंगी ‘रोटरी’चे अध्यक्ष नित्यानंद पाटील व ‘आरोग्यदीप’चे अध्यक्ष डॉ. शशिकांत गाजरे यांची प्रमुख उपस्थिती होती. रॅलीला नूतन मराठा महाविद्यालय, शिवाजी पुतळा, नेहरू चौक, टॉवर, चित्रा चौक, शिवतीर्थ मैदान, नवीन बसस्थानक, आकाशवाणी चौकमार्गे गणपतीनगरातील रोटरी सभागृहात समारोप झाला. रॅलीत किडनी कशी वाचवावी व मधुमेहाविषयी माहितीपत्रकांचे वाटप करून फलकाद्वारे जनजागृती करण्यात आली. वाहनांवर किडनीची प्रतिकृती व ध्वनिक्षेपकाद्वारे माहिती देण्यात येत होती. प्रदीप खिंवसरा यांनी रॅलीतील दुचाकीस्वारांना हेल्मेट उपलब्ध करून दिले होते. रॅलीत ‘रोटरी’चे डॉ. जयंत जहागिरदार, प्रभाकर जंगले, डॉ. तुषार फिरके, योगेश गांधी, गिरीश कुलकर्णी, प्रदीप खिंवसरा, संदीप शर्मा, दिलीप जैन, श्‍याम अग्रवाल, राजेश वेद, ‘आरोग्यदीप’चे डॉ. प्रमोद पाटील, जयंत चौधरी यांच्यासह ‘रोटरी’चे सदस्य, ‘आरोग्यदीप’चे कार्यकर्ते, अनेक वैद्यकीय कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

Web Title: motorcycle rally for kidney publicity