Nandurbar News : सराईत मोटारसायकल चोर पोलिसांच्या ताब्यात; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

bike thief & police
bike thief & policeesakal
Updated on

नंदुरबार : मोटारसायकली चोरून कमी किमतीत विकणारा मोलगी (ता. अक्कलकुवा) येथील रहिवासी असलेल्या सराईत गुन्हेगारास पोलिसांनी शहादा येथील भाजी मंडईतून अटक केली. त्याच्याकडून एक लाख तीन हजार रुपये किमतीच्या चार दुचाकी जप्त केल्या आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी गुन्हे बैठकीत मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा आढावा घेतला असता, जिल्ह्यात मोटारसायकल चोरीचे गुन्हे अधिक दाखल आहेत. त्याअनुषंगाने गुन्ह्यांचा गांभीर्याने तपास करून मोटारसायकल चोरीतील सक्रिय गुन्हेगारांवर कारवाईचे आदेश दिले. (Motorcycle thief in police custody Action of local crime branch seizure of four two wheelers worth one lakh Jalgaon News)

bike thief & police
Nashik News : रेकॉर्डिंग अभावी CCTV फक्त शो पीस! बँकांसह व्यापाऱ्यांकडे डेटा सेव्ह नसल्याने अडचण

त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांनी जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांतर्गत चोरी झालेल्या मोटारसायकल चोरीच्या पद्धतीचा अभ्यास करून वारंवार चोरी होणारी ठिकाणे, वेळ, दिवस किंवा चोरी होणारी विशेष कंपनीची मोटारसायकल यांची माहिती घेतली.

तपास सुरू असताना ६ जनेवारीला पोलिस अधीक्षक पाटील यांना शहादा शहरातील जुनी भाजी मंडई परिसरात एकजण कागदपत्र नसलेली मोटारसायकल कमी किमतीत विकत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी एलसीबीचे पोलिस निरीक्षक खेडकर यांना सांगितली. स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक शहादा शहरातील जुनी भाजी मंडई परिसरात गेले.

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

bike thief & police
Dhule News : सुटीच्या दिवशी लाच घेणारा भूमिअभिलेख लिपिक जाळ्यात

एका पानटपरीजवळ एक जण विनानंबर प्लेट असलेल्या मोटारसायकलसह संशयास्पद हालचाली करताना दिसला. पथकाने त्यास ताब्यात घेतले. त्याने नाव अनिल नरपत वसावे (वय २२, रा. सरी पो. मोलगी, ता. अक्कलकुवा, जि. नंदुरबार) असे सांगितले. मोटारसायकलबाबत विचारले असता त्याने दोन-तीन दिवसांपूर्वी शहादा शहरातील राजपाल वाइन शॉपच्या मागे एका घरासमोरून चोरी केल्याचे सांगितले. मोटारसायकलबाबत शहादा पोलिसांत गुन्हा नोंद आहे.

अधिक तपासात अनिल नरपत वसावे याच्याविरुद्ध यापूर्वीदेखील मालमत्तेविरुद्धचे गुन्हे दाखल असल्याचे स्पष्ट झाले. त्याने धडगाव, मोलगी परिसरातून आणखी तीन मोटारसायकली चोरलेल्या असून, त्या शहादा येथील नवीन बसस्थानकाच्या मागे काटेरी झुडपांमध्ये लपवून ठेवल्याची माहिती दिली. ८८ हजार रुपये किमतीच्या तीन मोटारसायकली ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत.

असे एकूण एक लाख तीन हजार रुपये किमतीच्या चार मोटारसायकली हस्तगत करून तीन मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.ही कामगिरी सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप पाटील, हवालदार सजन वाघ, मुकेश तावडे, पोलिस नाईक पुरुषोत्तम सोनार, मोहन ढमढेरे, पोलिस अमलदार अभिमन्यू गावित, दीपक न्हावी यांच्या पथकाने केली आहे.

bike thief & police
Jalgaon Crime News : New Yearची दुकानफोडी चोरट्याला पचलीच नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com