संगमनेरमध्ये सरकारची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढून शेतकऱ्यांचे आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 जून 2018

आश्वी - संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील संतप्त शेतकऱ्यांचे आंदोलन पाचव्या दिवशीही सुरुच राहीले. आज सकाळी आंबी खालसा फाटा येथे जमलेल्या सुमारे 150 शेतकऱ्यांनी दुधाचे कॅन रस्त्यावर ओतले. सरकारच्या निषेधाच्या घोषणा देत सरकारची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढून, अंत्यविधी करण्यात आला. 

शेतीमालाला किमान हमीभाव आणि दरमहा निश्चित उत्पन्नाची खात्री या मागण्यांसाठी देशातील शेतकरी मैदानात उतरले आहेत. संपाच्या तिसऱ्या दिवशी आंबीखालसा फाट्यावर संतप्त शेतकऱ्यांनी सकाळी दहा वाजता सकाळी पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गा लगतच्या रस्त्यावर दुध ओतून आंदोलन करीत सरकारचा निषेध केला होता. तर आजच्या पाचव्या दिवशी त्यापुढे जावून, सरकारची अंत्ययात्रा काढण्यात आली. 

या वेळी घारगावचे सरपंच सुरेश कान्होरे, तान्हाजी मुंढे, पंचायत समिती सदस्या प्रियंका गडगे, अरुण कान्होरे, बाळासाहेब ढोले, सुरेश गाडेकर, दत्तात्रेय कान्होरे, निवृत्ती कहाणे, नितीन काशीद आदींसह सुमारे 25 ते 30 महिला शेतकरी उपस्थित होत्या. 

Web Title: Movement of farmers by removing the symbolic funeral of the government in Sangamner