धुळे- खासगी विमा कंपनीने अनेक कारणे पुढे करत दावा निकाली काढताना येथील संबंधित डॉक्टर व हॉस्पिटलचे ७० हजार रुपयांचे नुकसान केल्याची तक्रार खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी संसदीय अधिवेशनातून केंद्र सरकारकडे केली. ही स्थिती लक्षात घेता खासगी विमा कंपन्यांच्या कारभारावर केंद्राने अंकुश आणावा, अशी मागणीही खासदार डॉ. बच्छाव यांनी केली.