Dhule Mumbai Railway : धुळे-मुंबई एक्स्प्रेस आता नियमित : खासदार डॉ. सुभाष भामरे

shubhash bhamre
shubhash bhamreesakal
Updated on

Dhule Mumbai Railway : भाजपचे माजी केंद्रीय मंत्री तथा विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रयत्नाने धुळेकरांना दिवाळी गिफ्ट मिळाले आहे. सीझनल धावणारी धुळे-मुंबई रेल्वे आता नियमित धावणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल अर्थात मुंबई ते धुळे एक्स्प्रेस ही विशेष रेल्वे आता नियमित करीत दररोज धावणार असल्याची अधिसूचना रेल्वे विभागाने जारी केली आहे.(MP Dr. Subhash Bhamre Statement of Dhule Mumbai Express now regular dhule news )

धुळे ते मुंबई स्वतंत्र रेल्वे सुरू करून ती रोज धावेल, असा दिलेला शब्द पूर्ण केला. धुळेकरांना दिलेले वचन पूर्ण झाले, असे खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी म्हटले आहे. धुळे ते दादर प्रवासासाठी पूर्वी दोन बोगी रोज सायंकाळी धुळ्यातून चाळीसगावपर्यंत जात. तेथून अमृतसर एक्स्प्रेसला त्या बोगी जोडून मुंबईपर्यंत रेल्वे प्रवासाची सुविधा होती.

मात्र कोरोनाकाळात ती सेवा बंद झाली. नंतर पुन्हा रेल्वे सुरू करावी, अशी मागणी होत असतानाच खासदार डॉ. भामरे यांनी दोन बोगी नव्हे, तर स्वतंत्र रेल्वेच धुळ्याहून मुंबईसाठी सुरू करावी, अशी मागणी करीत पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन धुळे-दादर एक्स्प्रेस ही आठवड्यातून तीन दिवस धावणारी विशेष रेल्वेसेवा सुरू करण्यात आली.

रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते धुळ्यातून त्या रेल्वे सेवेचा प्रारंभ करण्यात आला. त्या वेळी खासदार डॉ. भामरे यांनी रेल्वेसेवा नियमित करण्याची मागणी केली होती आणि त्यासाठी सातत्याने रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता.

shubhash bhamre
Dhule Dadar Railway : धुळे-दादर रेल्वेला 3 महिने एक्सटेन्शन; आठवड्यातून 3 दिवस धावणार

धुळेकर प्रवाशांनी धुळे-दादर एक्स्प्रेसला दिलेला अभूतपूर्व प्रतिसादामुळे अखेर रेल्वे मंत्रालयाने धुळे ते मुंबई एक्स्प्रेस रेल्वे नियमित करण्याचा निर्णय घेतला व अधिसूचना जारी केली आहे.

प्रवाशांसाठी असेल ही सुविधा

गाडी क्रमांक ११०११ डाउन ः मुंबई-धुळे ही रेल्वे मुंबईहून दुपारी १२:०० ला सुटेल व धुळ्याला सायंकाळी ०८:५० ला पोचेल. गाडी क्रमांक ११०१२ अप ः धुळे-मुंबई रेल्वे धुळ्याहून सकाळी ०६:३० ला सुटेल व मुंबईला दुपारी ०२:१५ ला पोचेल.

लवकरच ही नियमित रेल्वेसेवा सुरू होईल. या रेल्वेला प्रतिसाद देऊन सुविधा यशस्वी करावी, असे आवाहन खासदार डॉ. भामरे यांनी केले. धुळे ते मुंबई स्वतंत्र रेल्वे मंजूर करून ती नियमित केल्याबद्दल त्यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे आभार मानले.

shubhash bhamre
Dhule Mumbai Railway : धुळे-मुंबई रेल्वे आता रोज; पुणे सेवेसाठी तत्त्वतः मान्यता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com