#शिक्षकदिन : नानासाहेब कुऱ्हाडे म्हणजे विध्यार्थी असलेले आदर्श गुरुजी

संतोष विंचू 
बुधवार, 5 सप्टेंबर 2018

येवला - थोडे सुशिक्षित कुटुंब त्यात घरात मोठा व चुणचुणीत असल्याने लाडाने नानासाहेब नाव ठेवले अन पुढे ते समजाचे लाडके ‘नाना’ झाले..चौथी-पाचवीत असतांना नानावर शिक्षकाचा इतका प्रभाव झाला की मी देखील असाच विध्यार्थीप्रिय शिक्षक होईल अशी खुणगाठ नानाने तेव्हा मनाशी बांधली..यासाठी आज वयाच्या चाळीशीतही नाना विध्यार्थीच आहे. केवळ आपल्या विध्यार्थ्यासाठी ! अनेक उपक्रम राबवून लोकप्रिय झालेला हा शिक्षक याच गुणांमुळे राज्यस्तरीय आदर्श शिक्षकाचा मानकरी ठरला आहे.  

येवला - थोडे सुशिक्षित कुटुंब त्यात घरात मोठा व चुणचुणीत असल्याने लाडाने नानासाहेब नाव ठेवले अन पुढे ते समजाचे लाडके ‘नाना’ झाले..चौथी-पाचवीत असतांना नानावर शिक्षकाचा इतका प्रभाव झाला की मी देखील असाच विध्यार्थीप्रिय शिक्षक होईल अशी खुणगाठ नानाने तेव्हा मनाशी बांधली..यासाठी आज वयाच्या चाळीशीतही नाना विध्यार्थीच आहे. केवळ आपल्या विध्यार्थ्यासाठी ! अनेक उपक्रम राबवून लोकप्रिय झालेला हा शिक्षक याच गुणांमुळे राज्यस्तरीय आदर्श शिक्षकाचा मानकरी ठरला आहे.  

नानासाहेब कुऱ्हाडे, जिल्हा परिषेदेच्या नेउरगाव प्राथमिक शाळेत पदवीधर शिक्षक.शैक्षणिक पात्रता आहे एम.ए. (दोन विषयांत) एम.एड,सेट, डी.एस.एम.बारावी डी.एड पदवीवरून नोकरी लागली पण एवढ्यावरच न थांबता आजही हे गुरुही शिकताय.आपल्या शिक्षणाच्या प्रवासाला पी.एचडी पूर्ण होईपर्यत पूर्णविराम न देण्याचा त्यांचा मानस आहे. ग्रामीण भागात व गरिबीत वाढलेले असल्याने ग्रामीण, गरीब, होतकरू विद्यार्थ्याबाबत कायम सकारात्मक व सर्वांना हवेहवेसे वाटणारे हे व्यक्तीमत्व विद्यार्थी व शिक्षकांचे लाडके व सुप्रिय शिक्षक म्हणून ओळखले जातात. सुरगाणा सारख्या आदिवासी भागात १९९८ साली शिक्षक म्हणून रुजू झालेल्या कुऱ्हाडे यांनी तेथेच शालेय उपक्रमाना सुरुवात केली. विविध उपक्रमांनी आदिवासी भागातील विद्यार्थी व समाजात एक नवचेतना निर्माण झाली.

२००६ मध्ये नेउरगाव शाळेत रुजू झाल्यावर तेथे शिष्यवृत्ती, सहशालेय उपक्रम, विविध स्पर्धा, कला, क्रीडा स्पर्धा राबवल्या. शिष्यवृत्तीचा १०० टक्के निकाल अशी घोडदौड सुरु झाली. पालकांच्या आग्रहाने त्यांना पुन्हा सातवीचा वर्ग दिला गेला होता. सेवा कालावधीतील सर्व प्रशिक्षणे प्रशिक्षणार्थी व सुलभक म्हणून कामकाज करतांना वेगळेपण कायमच सिद्ध केले आहे. नाविन्यपूर्ण अध्यापनातून विद्यार्थ्यांच्या भावी यशावर मोहोर उमटविल्या आहेत.शिष्यवृत्ती परीक्षेचे नियोजनात जुलै महिन्यापासून कामकाज सुरु केल्याने नेहमीच त्यांचे विध्यार्थी अव्वल राहिले. त्यासाठीचे साहित्य स्व-खर्चाने अगोदर उपलब्ध करून देतात.शिवाय शाळेसाठी पाच लाखापेक्षा अधिक लोकसहभाग मिळवत शाळेला देखणी व गुणवान करण्यात त्यांनी सिंहाचा वाटा उचलला आहे.

ते तालुका स्तर शैक्षणिक उपक्रमांचे सातत्याने सूत्रसंचालन करतात.तालुका तंत्रस्नेही होण्यासाठी त्यांनी उपशिक्षणाधिकारी सोनवणे साहेबांच्या उपस्थितीत तंत्रस्नेही कार्यशाळा आयोजित केली. त्यातून मोठा लोकसहभाग जमा होऊन ५० वर अधिक् शाळा डिजिटल झाल्या. जीवन शिक्षणसाठी सातत्याने लेखन,राज्यस्तरावर निबंध लेखन, जलसाक्षरता, वृक्षारोपण, स्वच्छता विषयक उपक्रम, प्रशिक्षणात सुलभक म्हणून कामकाज, शिक्षनोत्सव मध्ये राज्य, विभाग जिल्हा,तालुका स्तरावर सुलभाक म्हणून कामकाज केले आहे. राष्ट्रीय चर्चासत्रामध्ये त्यांनी सहभाग घेतला आहे.विध्यार्थी दत्तक घेऊन त्यांचे पालकत्व निभावताना सामाजिक क्षेत्रात त्यानी योगदान दिले आहे. योगदान, रक्तदान, व्याख्याने, व्याख्यानमाला, दत्तक विद्यार्थी, गरीब होतकरू विद्यार्थ्यांना मदत केलीच पण शैक्षणिक पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे. कृतिसंशोधन अंमलबजवणी शैक्षणिक संशोधन परिषद पुणे येथे सादर केला असून योगगुरू म्हणून कामकाज, भविष्यात माहिती संप्रेषण विषयात विद्यावाचस्पती करन्यावर ते ठाम आहे.त्यांच्या या गुणांची दखल घेऊनच राज्य शासनाने त्यांना प्राथमिक विभागातून जिल्ह्यातून निवड करत आदर्श पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.

“स्वत शिकून विध्यार्थ्यांना शिकवावे याच उदात्त भूमिकेने मी प्रामाणिकपणे काम करतोय. विध्यार्थी माझे दैवत असून त्यांच्यासाठी केलेल्या कामाची दखल राज्य शासनाने घेतल्याचा आनंद अफलातून आहे.यामुळे माझ्या धडपडीला अजून बळ मिळणार आहे.”
नानासाहेब कुऱ्हाडे, आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mr. Nanasaheb Kurhade, who was a student of the age of fourty