महावितरणचा सौरऊर्जा प्रकल्प लासलगाव येथे कार्यान्वित 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 मे 2019

नाशिक - कृषिपंपांना दिवसा वीज मिळावी, या शेतकऱ्यांच्या बहुप्रलंबित मागणीची पूर्तता करण्यासाठी सरकार आणि महावितरणच्या एकत्रित प्रयत्नांतून "मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी' योजनेंतर्गत स्वमालकीच्या जागेवरील महावितरणचा राज्यातील सर्वांत मोठा सौरऊर्जानिर्मिती प्रकल्प लासलगाव (जि. नाशिक) येथे कार्यान्वित करण्यात आला. दरम्यान, जिल्ह्यात सध्या 3 प्रकल्पांमधून 3 मेगावॉटपेक्षा अधिक सौरऊर्जेची निर्मिती होत आहे. 

राज्यात महावितरणकडून वितरित होणाऱ्या एकूण विजेपैकी जवळपास 30 टक्के वीज कृषिपंपांसाठी वापरली जाते. ही वीज शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिली जाते. पारंपरिक पद्धतीने सध्या कृषिपंपांना चक्राकार पद्धतीने दिवसा 8 तास, तर रात्री 10 तास वीजपुरवठा होतो. दिवसा वीज उपलब्ध करून देण्याची शेतकऱ्यांची गेल्या अनेक दिवसांपासूनची मागणी होती. तसेच, कृषी क्षेत्राला माफक दरात व आवश्‍यकतेनुसार वीजपुरवठा करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना हाती घेतली. महानिर्मिती व महाऊर्जा यांच्यातर्फे सार्वजनिक व खासगी सहकार्यातून या योजनेतील प्रकल्प कृषिपंप वापर अधिक असलेल्या ठिकाणी उभे राहत आहेत. सरकारी, गावठाण, खडकाळ व पडीक जमिनी आदी ठिकाणी प्रकल्प उभे केले जात आहेत. याशिवाय, महावितरणचे उपकेंद्र व अन्य ठिकाणच्या जागेवरही प्रकल्प उभारण्यात येत आहेत. 

लासलगाव उपकेंद्र परिसरात जवळपास 20 हजार चौरस मीटर जागेवर उभारण्यात आलेला 1.3 मेगावॉट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प महावितरणच्या स्वमालकीच्या जागेतील राज्यातील सर्वांत मोठा प्रकल्प आहे. मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर, अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रकल्प नुकताच कार्यान्वित करण्यात आला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MSEB Solar Power Project implemented in Lasalgaon