MSEDCL : ‘न्याहळोदच्या घटनेशी महावितरणचा संबंध नाही’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MSEDCL

MSEDCL : ‘न्याहळोदच्या घटनेशी महावितरणचा संबंध नाही’

धुळे : कापसाच्या विक्रीनंतर थकीत वीजबिलाचा भरणा करू, हाती पैसे नसल्याने वीजबिल भरता आले नाही या कारणावरून न्याहळोद (ता. धुळे) येथील तरुण शेतकरी (Farmer) भारत ऊर्फ चैत्राम पाटील (वय २६) यांनी कीटकनाशक प्राशन करून शेतातच आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली. (msedcl has no connection with cause of farmer suicide said pr officer Mahavitaran dhule news)

या शेतकऱ्याच्या शिवारातील डीपीवरील वीज कनेक्शनही वीज वितरण कंपनीने बंद केल्याची तक्रार झाली, असे काही ग्रामस्थांसह माजी आमदार शरद पाटील यांच्याकडून सांगण्यात आले. मात्र, चैत्राम पाटील यांच्या नावे कोणत्याही प्रकारचे शेतीसंबंधी वीज कनेक्शन नाही, ते महावितरण कंपनीचे कृषी ग्राहकही नव्हते.

हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

तसेच त्यांच्या वडिलांच्या नावेदेखील कुठलेही शेतीसंबंधी वीज कनेक्शन नाही. त्यामुळे चैत्राम पाटील यांच्या आत्महत्येच्या कारणाशी महावितरण कंपनीचा दुरान्वयानेही संबंध नसल्याचे महावितरणच्या जळगाव परिमंडलाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी पत्रकात म्हटले आहे.

टॅग्स :DhuleMSEDCLFarmer Death