मुख्तार अन्सारी निवडणूक लढवणार नाही; सलग पाच वेळा विजयी

Mukhtar Ansari will not contest the election
Mukhtar Ansari will not contest the electionMukhtar Ansari will not contest the election

मऊचे आमदार मुख्तार अन्सारी (Mukhtar Ansari) यावेळी निवडणूक लढवणार नाही. सुमारे तीन दशकांत अन्सारी निवडणुकीच्या रिंगणात नसण्याची ही पहिलीच वेळ आहे. मुख्तार अन्सारी यांनी आपली जागा मुलगा अब्बास अन्सारीला दिली आहे. अब्बास (Abbas Ansari) यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. सपा आघाडीचा भाग असलेल्या सुभाष पक्षानेही अब्बास अन्सारी यांना तिकीट दिले आहे. आमदार मुख्तार अन्सारी यांनी मऊ सदर मतदारसंघातून सलग पाच विजयांची नोंद केली आहे. (Mukhtar Ansari will not contest the election)

मुख्तार अन्सारी यांच्या उमेदवारीसाठी गेल्या आठवड्यात न्यायालयाकडून परवानगीही मागवण्यात आली होती. न्यायालयाने त्यांचे वकील आणि इतरांनाही नामांकन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुरुंगात जाण्याची परवानगी दिली होती. नामांकन प्रक्रियेच्या पहिल्या दिवशी त्यांचे वकील दरोगा सिंग यांनी कोर्टातील सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या होत्या. कारागृहात भेटण्यासाठी सर्व २२ जणांची आरटीपीसीआर चाचणीही करण्यात आली.

Mukhtar Ansari will not contest the election
भीषण अपघातात अख्ख कुटुंब ठार; कारचा टायर फुटल्याने घडला अनर्थ

मुख्तार अन्सारी (Mukhtar Ansari) यांच्यासाठी सुभासपा नावाने उमेदवारी अर्ज घेण्यात आला. दरम्यान, सुभासपाचे प्रमुख ओमप्रकाश राजभर यांनी मुख्तार किंवा अब्बास या दोघांपैकी कोणी सदरमधून लढू शकतो, असे सांगून वातावरण तापवले होते. मुख्तार अन्सारी निवडणूक लढवणार नसल्याचा निर्णय सोमवारी घेण्यात आला.

मुख्तार यांचे वकील दरोगा सिंग यांनी सांगितले की, त्यांनी त्यांचा वारसा मुलगा अब्बास अन्सारीला दिला आहे. अब्बास (Abbas Ansari) यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. मागच्या विधानसभा निवडणुकीत मुख्तार अन्सारी यांनी मऊ सदरमधून आणि मुलगा अब्बास यांनी घोसी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com