Ladki Bahin Yojana
sakal
जळगाव: ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेत ई-केवायसीदरम्यान पती किंवा वडिलांचे आधारकार्ड देणे आवश्यक असल्याने अनेक महिलांची मोठी अडचण झाली होती. पती, वडील हयात नसल्यास त्यांचे आधारकार्ड कसे द्यावे, याबाबत लाडक्या बहिणींना प्रश्न पडला होता. मात्र ती अडचण आता दूर झाली आहे. आता अशा महिलांसाठी शासनाने संबंधित व्यक्तीचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे.