आरक्षणामुळे ब्राह्मण मुलांना जावे लागते परदेशात

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 एप्रिल 2017

नाशिक : आरक्षणामुळे ब्राह्मण मुलांना शिक्षणासाठी परदेशात जावे लागते, अशी आरक्षणावर टीका आज येथे पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.

एवढ्यावर न थांबता त्यांनी परदेशात शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरी-व्यवसाय-उद्योगासाठी देशात पूरक वातावरण तयार झाले पाहिजे, असा "घरचा आहेर' सरकारला दिला. चित्पावन ब्राह्मण संघातर्फे झालेल्या परशुराम वेद पुरस्कार वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या. 

वेदमूर्ती महेश सोवनी, शैलेंद्र काकडे, सचिन कुलकर्णी, श्रीधर अघोर यांना हा पुरस्कार सौ. टिळक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

या वेळी टिळक म्हणाल्या, की विविध समाजबांधवांचे निघालेले मोर्चे पाहून आपलाही मोर्चा काढण्याची गरज ब्राह्मण समाजाला भासली नाही. मात्र एकत्र यावे एवढी भावना निश्‍चित निर्माण झाली. पहिल्यांदा सर्व ब्राह्मण एकत्र आलेले दिसले. 

कोकणातील चित्पावन ब्राह्मण आता "ग्लोबल' झाले आहेत. पेटून उठण्याची त्यांची जिद्द आजही कायम आहे. त्यामुळे ते विविध क्षेत्रांत आपला ठसा उमटवत आहेत. हेच कार्य आपणाला पुढे न्यायचे आहे. मुळातच, ब्राह्मण समाजाला आजवर आरक्षणाची आवश्‍यकता भासलेली नाही. बुद्धीच्या जोरावर समाजबांधव प्रगती करत आहेत, असे सांगून टिळक यांनी लोकमान्य टिळक यांच्या जागृतीविषयक उपक्रमांची माहिती दिली.

Web Title: mukta tilak sparks controversy with statement against reservation