Dhule News : मुंबई सेंट्रल ते भुसावळ प्रवासी रेल्वे सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Railway

Dhule News : मुंबई सेंट्रल ते भुसावळ प्रवासी रेल्वे सुरू

धुळे : पश्‍चिम खानदेशच्या प्रवाशांसाठी थेट मुंबई सेंट्रलला जाण्यासाठी नवीन हंगामी प्रवासी रेल्वे सोमवार (ता. ९)पासून ३१ मार्चपर्यंत प्रायोगिक तत्त्वावर सुरू झाली. आमदार जयकुमार रावल, खासदार डॉ. सुभाष भामरे, खासदार हीना गावित, खासदार उन्मेष पाटील यांनी या रेल्वेसाठी पाठपुरावा केला. (Mumbai Central to Bhusawal passenger train starts Dhule News)

भुसावळ बांद्रा टर्मिनस खानदेश एक्स्प्रेसच्या प्रतिसादामुळे प्रवाशांची खानदेश एक्स्प्रेस रोज सुरू करण्याची मागणी उत्तर महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींकडे झाली. मात्र, मध्य रेल्वेच्या तांत्रिक अडचणींमुळे या रेल्वेस ट्रॅक उपलब्ध होत नव्हता;

परंतु मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे व रेल्वे बोर्डच्या संयुक्त बैठकीत आमदार रावल, खासदार डॉ. भामरे, खासदार गावित, खासदार पाटील यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे पाठपुरावा केला. दिल्लीस्थित रेल्वे बोर्डाने मागणीस नुकतीच संमती देत मुंबई सेंट्रल ते भुसावळ (०९०५१) व भुसावळ ते मुंबई सेंट्रल (०९०५२) ही रेल्वे प्रायोगिक तत्त्वावर सुरू केली.

हेही वाचा : योग्य वेळेतच करा इच्छापत्र आणि व्हा चिंतामुक्त

हेही वाचा: Dhule News : इमारतीवर विनापरवानगी मोबाईल टॉवर! मनपा अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून साहित्य जप्त

थेट मुंबई सेंट्रलसाठी नवीन हंगामी प्रवासी रेल्वे ९ जानेवारीपासून ३१ मार्चपर्यंत प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येत असून, ती रविवार, मंगळवार व शुक्रवारी रात्री ११.५५ ला मुंबई सेंट्रल येथून सुटेल.

प्रवासादरम्यान बोरिवली, भोईसर, वापी, बलसाड, नवसारी, चलथान, बेस्तान, बिने, बारडोली, व्यारा, नवापूर, नंदुरबार या ठिकाणी थांबून सकाळी नऊला दोंडाईचा, सकाळी ९.२८ ला शिंदखेडा, सकाळी ९.४३ ला नरडाणा, सकाळी दहाला अमळनेर, १०.४७ ला धरणगाव, ११.१० ला पाळधी, ११.५५ ला जळगाव व दुपारी बाराला भुसावळ येथे पोचेल.

दोंडाईचाहून सोमवार, बुधवार व शनिवारी सायंकाळी ५.४० ला भुसावळ येथून सुटेल. ६.२५ ला जळगाव, ६.४५ ला पाळधी, ६.५८ ला धरणगाव, ७.१८ ला अमळनेर, ७.४४ ला नरडाणा, आठला शिंदखेडा, रात्री ८.१८ ला दोंडाईचा येथून सुटेल.

रेल्वेला बोईसर-वापी येथे थांबा देण्यात आला आहे, असे पश्चिम रेल्वेचे सल्लागार समितीचे सदस्य प्रवीण महाजन, दोंडाईचा प्रवासी संघटनेचे अध्यक्ष खुर्शिद कादियानी, शिंदखेडा प्रवासी संघटनेचे अध्यक्ष दादा मराठे, नरडाणा सल्लागार समिती सदस्य संजीवनी सिसोदे, धरणगाव सल्लागार समितीचे सदस्य महेंद्र कोठारी यांनी सांगितले.

हेही वाचा: Legislative Council Elections : नाशिक विभागीय आयुक्तांकडून विधान परिषद निवडणुकीचा आढावा

टॅग्स :Dhulerailway