मनपात पाच दिवसांत 75 लाख वसूल 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 मार्च 2017

धुळे - मालमत्ता कराच्या थकबाकीवरील शास्ती माफीच्या निर्णयानंतर आज मालमत्ताधारकांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे दिसून आले. आज तब्बल 19 लाख 58 हजार रुपयांचा कर भरणा झाला. नोटाबंदीनंतर हा सर्वाधिक कर भरणा असल्याचे महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, शास्ती माफीच्या निर्णयानंतर पाच दिवसांतच 74 लाख 86 हजार रुपयांची करवसुली झाली आहे. 

महापालिकेने 27 फेब्रुवारी ते पाच मार्चदरम्यान मालमत्ता कर थकबाकी शास्तीवर 50 टक्के, तर 6 मार्च ते 20 मार्चदरम्यान 25 टक्के सूट दिली आहे. या प्रक्रियेत आज थकबाकीदारांसह चालू कर अदा करणाऱ्या मालमत्ताधारकांनी चांगला प्रतिसाद दिला. आज 19 लाख 58 हजार 724 रुपये करवसुली झाली. नोटाबंदीच्या निर्णयानंतर ही सर्वाधिक करवसुली ठरली. 27 फेब्रुवारीला 14 लाख 96 हजार 786, 28 फेब्रुवारीला 12 लाख 24 हजार, एक मार्चला 12 लाख 72 हजार, दोन मार्चला 15 लाख 35 हजार रुपये करवसुली झाली. शास्तीवर 50 टक्के सूटसाठी अद्यापही दोन दिवस आहेत. 27 फेब्रुवारी ते 3 मार्च या पाच दिवसांत एकूण 74 लाख 86 हजार 510 रुपये करवसुली झाली. 

एकूण वसुली 19 कोटींवर 
2016-17 या आर्थिक वर्षात अर्थात एप्रिल-2016 पासून आजअखेर एकूण 19 कोटी 17 लाख दोन हजार 570 रुपये मालमत्ता करवसुली झाली आहे. 

बाजार विभागालाही लॉटरी 
शहरातील फेरीवाल्यांना बायोमेट्रिक ओळखपत्र देण्याच्या कार्यक्रमांतर्गत 811 ओळखपत्रे आतापर्यंत तयार झाली आहेत. महापौर कल्पना महाले, आयुक्त संगीता धायगुडे यांच्या हस्ते काल (ता. 2) या बायोमेट्रिक ओळखपत्रांचे वाटप झाले. ओळखपत्र घेण्यासाठी आज महापालिकेत फेरीवाल्यांनीही गर्दी केली. थकबाकी अदा करत फेरीवाल्यांनी ओळखपत्र घेतले. आज शंभर ओळखपत्रांचे वितरण झाले. त्यामुळे सुमारे 50 हजार रुपये बाजार शुल्क वसूल झाल्याचे विभागप्रमुख डी. आर. कलाल यांनी सांगितले. एरवी रोज बाजार विभागाची शुल्क वसुली हजार ते बाराशे रुपये एवढीच असते. 

Web Title: Municipal 75 million recovered in five days