मनपाने नाकारला घरपट्टीचा भरणा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 नोव्हेंबर 2016

नाशिक - काळ्या पैशांच्या सर्जिकल स्ट्राइकचा धसका महापालिकेनेही घेतला. महापालिकेच्या करवसुली कार्यालयात आज भरणा करण्यासाठी आलेल्या हजारो नागरिकांना पाचशे व हजार रुपयांच्या नोटा स्वीकारणार नसल्याचे जाहीर केल्याने परतावे लागले. त्यामुळे वसुलीवर चांगलाच परिणाम झाला आहे. आज दिवसभरात महापालिकेकडे जमा झालेला महसूल बहुतांश ऑनलाइन भरणामधून प्राप्त झाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केलेल्या भाषणात रात्री बारानंतर पाचशे व हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद होणार असल्याचे जाहीर केल्यानंतर पाचशे व हजारांच्या नोटांचे करायचे काय, असा प्रश्‍न अनेकांना पडला.

एलआयसीचे हप्ते भरण्यापासून ते थकलेले करदेखील भरण्यासाठी आज नागरिक सरसावले होते. सध्या नागरिकांना घरपट्टी व पाणीपट्टीची देयके देण्यात आली आहे. आज अचानक देयके अदा करण्यासाठी महापालिकेच्या वसुली केंद्रांवर गर्दी झाली होती. पण, मोठ्या किमतीच्या नोटा चलनात नसल्याने आज वसुली अधिकाऱ्यांनी नोटा स्वीकारल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांना माघारी फिरावे लागले. घरपट्टीतून मंगळवारी १६ लाख ६३ हजार रुपये वसुल झाले. आज दिवसभरात १५ लाख ६८ हजार रुपये मिळाले. प्राप्त झालेल्या महसुलात बहुतांश कर ऑनलाइन पद्धतीने प्राप्त झाले आहेत.

पाणीपट्टीतून मंगळवारी सहा लाख ६० हजार रुपये प्राप्त झाले होते. आज एक लाख ४१ हजार रुपये प्राप्त झाले.

Web Title: Municipal denied house tax payment