महापालिका जिल्‍हा न्यायालयात हजर; उद्या कामकाज

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 डिसेंबर 2016

जयहिंद संस्थेचा जलतरण तलाव हटविण्याचा ‘इश्‍यू’; तूर्त ‘जैसे थे’ स्थिती 
धुळे - कुठलीही लेखी परवानगी नसताना पांझरा नदीकाठी असलेल्या जयहिंद शैक्षणिक संस्थेच्या जलतरण तलाव हटविण्याच्या महापालिकेच्या कारवाईला शुक्रवारी (ता. १६) संस्थाचालकांनी ठिय्या आंदोलनातून तीव्र विरोध केला. यासंदर्भात जिल्हा न्यायालयात आज महापालिका प्रशासन हजर झाले. त्यात बाजू मांडण्यासाठी सोमवारपर्यंत (ता. १९) मुदत मागण्यात आली. त्यानुसार सोमवारी कामकाज होईल. 

जयहिंद संस्थेचा जलतरण तलाव हटविण्याचा ‘इश्‍यू’; तूर्त ‘जैसे थे’ स्थिती 
धुळे - कुठलीही लेखी परवानगी नसताना पांझरा नदीकाठी असलेल्या जयहिंद शैक्षणिक संस्थेच्या जलतरण तलाव हटविण्याच्या महापालिकेच्या कारवाईला शुक्रवारी (ता. १६) संस्थाचालकांनी ठिय्या आंदोलनातून तीव्र विरोध केला. यासंदर्भात जिल्हा न्यायालयात आज महापालिका प्रशासन हजर झाले. त्यात बाजू मांडण्यासाठी सोमवारपर्यंत (ता. १९) मुदत मागण्यात आली. त्यानुसार सोमवारी कामकाज होईल. 

कुमारनगर पूल ते वडजाई डायव्हर्शनपर्यंत पांझरा नदीकिनारी दुतर्फा साडेपाच किलोमीटर रस्ता करण्याचा प्रस्ताव आमदार अनिल गोटे यांनी हाती घेतला आहे. तसेच जयहिंद हायस्कूलमार्गे पांझरा नदीवरील पाइप पूलमार्गे जिल्हा शासकीय रुग्णालयापर्यंत रस्ता करण्यासाठीही या पाइप पुलाचे काम आमदार गोटे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू केले आहे. या नियोजित मार्गांमध्ये जयहिंद शैक्षणिक संस्थेचा अतिक्रमित जलतरण तलाव अडथळा ठरत असल्याची आमदार गोटे यांची भूमिका आहे. त्यामुळे हा तलाव हटविण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. दोन आठवड्यांपूर्वी आमदारांनी स्वतः तलावाची एक संरक्षक भिंत पाडून टाकली. नंतर काल (ता. १६) पुन्हा महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाच्या मदतीने तलावाचे उर्वरित बांधकाम हटविण्यास सकाळी अकरानंतर प्रारंभ झाला. या कारवाईस जयहिंद संस्थेच्या अध्यक्षांसह संचालक, कर्मचाऱ्यांनी तीव्र विरोध केला. 

‘जेसीबी’समोर ठिय्या आंदोलन करीत संस्थाचालकांनी तलाव हटविण्यासंदर्भात कारवाईला मनाई हुकूम मिळावा, अशा मागणीचा दावा जिल्हा न्यायालयात काही दिवसांपूर्वीच दाखल असल्याने तूर्त ही कारवाई थांबवावी, तसेच महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाकडे कुठलाही लेखी आदेश नसल्याने बेकायदेशीर कारवाई केली जाऊ नये, अशी मागणी केली होती. यावर महापालिका प्रशासनाने पांझरा नदीकाठी दुतर्फा ‘डीपी’ रस्ता करायचा असल्याने जलतरण तलाव हटवावा लागेल, याकामी सहकार्य करावे आणि नियमानुसार भरपाई म्हणून ‘टीडीएस’ किंवा ‘एफएसआय’ दिला जाईल, असे पत्र जयहिंद संस्थेला शुक्रवारी सायंकाळनंतर दिले. या पाच ते सहा तासांच्या कालावधीत आमदार गोटे यांच्या नेतृत्वाखालील लोकसंग्राम पक्षाचे काही कार्यकर्ते आणि जयहिंद संस्थेच्या काही कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला. तो हातघाईवर गेला. 

असे असताना जिल्हा न्यायालयात जयहिंद संस्थेच्या दाव्यावर आज कामकाज झाले. त्यावेळी सरकार पक्षाबरोबर महापालिकेलाही प्रतिवादी करण्यात आल्याने महापालिका प्रशासनाचे प्रतिनिधी हजर झाले. त्यांच्यातर्फे ॲड. ए. बी. शहा, तर जयहिंद संस्थेतर्फे ॲड. ठकवाणी उपस्थित झाले. दाव्यावर बाजू मांडण्यासाठी महापालिकेमार्फत ॲड. शहा यांनी सोमवारपर्यंत (ता. १९) मुदत मागून घेतली. ॲड. ठकवाणी यांनी तलावाला असलेली परवानगी व आनुषंगिक माहिती सादर केली. सोमवारी पुन्हा कामकाज होणार असल्याने तलावाबाबत ‘जैसे- थे’ स्थिती राहील.

Web Title: municipal in district court