‘मनपा’ची मालमत्ताकरात एप्रिलसाठी १० टक्के सूट - आयुक्त सोनवणे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 एप्रिल 2017

जळगाव - शहरातील नागरिकांनी २०१७-१८ च्या मालमत्ताकराचा एप्रिलमध्ये भरणा केल्यास त्यांना १० टक्के रकमेची भरीव सूट देण्यात येईल, अशी घोषणा आयुक्त जीवन सोनवणे यांनी केली आहे. 

यासंदर्भात त्यांनी थकबाकीची व शासकीय कराची रक्कम वगळून ही सूट देण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. नागरिकांना २०१७-१८ ची घरपट्टीची बिले मिळाली नसली, तरी मागील वर्षाच्या कर मागणी बिलाच्या आधारावर मालमत्ताकराची ही रक्कम भरता येईल. नागरिकांनी एप्रिलमध्ये आपल्या कराचा भरणा करून जास्तीत जास्त सूट मिळणाऱ्या रकमेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Web Title: municipal property tax 10% discount

टॅग्स