मनपा शाळांना गतवैभव मिळावे - कल्पना महाले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जानेवारी 2017

धुळे - महापालिकेच्या शाळांना गतवैभव प्राप्त व्हावे, या शाळा नावारूपाला याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करत शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी शक्‍य तेवढे प्रयत्न करू, असे आश्‍वासन महापौर कल्पना महाले यांनी पुरस्कार वितरण कार्यक्रमात दिले. 

धुळे - महापालिकेच्या शाळांना गतवैभव प्राप्त व्हावे, या शाळा नावारूपाला याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करत शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी शक्‍य तेवढे प्रयत्न करू, असे आश्‍वासन महापौर कल्पना महाले यांनी पुरस्कार वितरण कार्यक्रमात दिले. 

महापालिका शिक्षण मंडळातर्फे आज सेंट झेवियर कनोसा कॉन्व्हेंट हायस्कूलमध्ये उपक्रमशील शाळा, उपक्रमशील शिक्षक, डिजिटल शाळा, स्वच्छ शाळा पुरस्कारांचे वितरण झाले. महापौर कल्पना महाले, आयुक्त संगीता धायगुडे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, सभापती संदीप महाले, उपसभापती गुफरान पोपटवाले, सुनील बैसाणे, मच्छिंद्र निकम, रामदास कोकणे, सचिन गायकवाड, शिक्षणाधिकारी जे. एस. पाटील आदी उपस्थित होते.

श्री. कदमबांडे म्हणाले, संदीप महाले यांनी सभापतिपद स्वीकारल्यानंतर महापालिका शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी त्यांनी चांगले प्रयत्न केले. या प्रयत्नांमुळेच शाळांचे रूप आज बदललेले दिसते.

सहकार्य केल्यास दर्जा सुधारू
महापालिकेच्या शाळांची स्थिती सुधारण्यासाठी सतत प्रयत्न सुरू आहेत. काही इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू केल्या. महापालिका प्रशासनाने सहकार्य केल्यास मनपा शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी अधिक प्रयत्न करू, असे सभापती महाले म्हणाले. प्रशासन अधिकारी महेंद्र जोशी यांनी प्रास्ताविक केले व आभार मानले.

पुरस्कारांचे स्वरूप असे
डिजिटल शाळा ः  महापालिका शाळा क्रमांक- ८, ९, २०, २५, ५३, ५६

उपक्रमशील शाळा ः महापालिका शाळा क्रमांक- ५६, ९, ५३, ८, २५, ९, 
श्री पिंपळादेवी प्राथमिक शाळा (मोहाडी), परिवर्तन प्राथमिक शाळा, श्री अग्रसेन महाराज प्राथमिक शाळा, हाजी लुकमान उर्दू प्राथमिक शाळा, अल मिजान उर्दू प्राथमिक शाळा, सेंट झेवियर्स कनोसा प्राथमिक शाळा, चावरा इंग्लिश मीडियम स्कूल

उपक्रमशील शिक्षक/शिक्षिका ः विद्या मोरे (मनपा शाळा ३), स्वप्नील राणे (मनपा शाळा ५६), रत्ना गुजर (मनपा शाळा ६४), आरिफबानो मुश्‍ताक अहमद (मनपा शाळा-१०), नूरजमालबानो अ. गफूर (मनपा शाळा २५), रियाज अहमद रईस अहमद (मनपा शाळा २०), चंद्रकांत सोनवणे (महाराणाप्रताप प्राथमिक शाळा), मीना पाठक (लायन्स नूतन प्राथमिक शाळा), मोहंमद शरीफ अब्दुल रहीम खान (एल. एम. सरदार प्राथमिक शाळा), आकील अहमद अब्दुल खालिद (स्वेस उर्दू प्राथमिक शाळा), मोहंमद युसूफ अहमद रजा (नॅशनल उर्दू प्राथमिक शाळा).

अपंग समावेशित शिक्षण विशेष उपक्रमशील ः झरिना शाह अहमद शाह फकीर.

स्वच्छ शाळा ः महापालिका शाळा क्र. ९, ४४, कमलाबाई प्र. दलाल प्राथमिक विद्यामंदिर, गर्ल्स उर्दू शाळा, मिल्लतनगर

Web Title: Municipal schools have done to the glory