पालिका विषय समिती सभापती निवड बिनविरोध

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 29 January 2020

शहादा: येथील पालिकेच्या विविध विषय समित्यांचा सभापती पदाची निवड आज बिनविरोध पार पडली.त्यात सार्वजनिक बांधकाम समिती सभापतीपद वसीम तेली, शिक्षण समिती सभापतीपदी उषाबाई कुवंर, आरोग्य समिती सभापती वर्षा जोहरी, पाणीपुरवठा समिती सभापती लक्ष्मण बढे, महिला व बालकल्याण समिती सभापती विद्या जगदाळे यांची निवड करण्यात आली. नियोजन व विकास समिती खाते उपनगराध्यक्षा रेखाबाई चौधरी यांचाकडे देण्यात आले.

शहादा: येथील पालिकेच्या विविध विषय समित्यांचा सभापती पदाची निवड आज बिनविरोध पार पडली.त्यात सार्वजनिक बांधकाम समिती सभापतीपद वसीम तेली, शिक्षण समिती सभापतीपदी उषाबाई कुवंर, आरोग्य समिती सभापती वर्षा जोहरी, पाणीपुरवठा समिती सभापती लक्ष्मण बढे, महिला व बालकल्याण समिती सभापती विद्या जगदाळे यांची निवड करण्यात आली. नियोजन व विकास समिती खाते उपनगराध्यक्षा रेखाबाई चौधरी यांचाकडे देण्यात आले.

शहादा पालिकेच्या विविध विषय समित्यांच्या सभापती पदांसाठी आज विशेष सभा घेण्यात आली. तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी पीठासीन अधिकारी होते. यावेळी नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्या उपस्थीत ही निवड प्रक्रिया पार पाडली. पालिकेत भाजपची सत्ता असली तरी बहुमत काँग्रेस पक्षाकडे असल्याने सर्व विषय समित्या काँग्रेसकडे आहेत. आज निवड प्रक्रियेच्या वेळी सत्ताधारी भाजप गटांचे नगरसेवक निवड प्रक्रियेत उपस्थित नव्हते.

गुन्हेशाखेवर पोलिस अधीक्षकांची सर्जिकल स्ट्राईक

माञ नागराध्यक्षांचा दालनात भाजप नगरसेवक थांबुन होते. असे असले तरी भाजपाच्या नगरसेविका विद्या जगदाळे यांची महिला व बाल कल्याण समितीचा सभापतीपदी निवड करण्यात आली. जगदाळे समर्थक व काँग्रेसचा सदस्यांनी निवडीनंतर जल्लोष केला. नवनिर्वाचित सभापतींचे सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दिपक पाटील, जिल्हा परिषदेचा सभापती जयश्री पाटील, पालिकेतील गटनेते मकरंद पाटील, बाजार समितीचे सभापती सुनिल पाटील यांनी अभिनंदन केले.

विषय समिती सभापती व सदस्य असे 

बांधकाम -सभापती- वसीम तेली, सदस्य- संगीता मंदिल. शहेरनाज पठाण. प्रशांत निकुभे.संजय साठे. सदिप पाटील. सुमनबाई पवार.शिक्षण समिती- सभापती- उषाबाई कुवंर. सदस्य- संगीता चौधरी. ज्योती नाईक. संजय साठे. आनंदा पाटील. संदिप पाटील. सायराबी सय्यद.

आरोग्य समिती- सभापती - वर्षा जोहरी. सदस्य- शमीमबी कुरेशी. ज्योती नाईक. योगीता वाल्हे. सहिदाबी अन्सारी. अनिता पाटील. सायराबी सय्यद.

पाणी पुरवठा - सभापती- लक्ष्मण बढे. सदस्य- ज्योती नाईक, संगीता मंदील. आनंदा पाटील. प्रशांत निकुभे. रियाज कुरेशी. सायराबी सय्यद.

महिला व बाल कल्याण समिती -सभापती- विद्या जगदाळे

सदस्य- शमीमबी कुरेशी. सुमनबाई पवार. शेहरनाज पठाण. रेखा पटेल. योगीता वाल्हे. जाहेदाबी पिजांरी.

नियोजन व विकास समिती- सभापती- उपनगराध्यक्षा रेखाबाई चौधरी.

सदस्य - शहेरनाज पठाण. सुमनबाई पवार. इकबाल शेख. सहिदाबी अन्सारी. अनिता पाटील. जाहेदाबी पिजांरी.

स्थायी समिती सदस्य. अखलाक अन्सारी.रिमा पवार. वाहिद पिजांरी.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Municipal Subject committee chairman elected unopposed