मुलाच्या मृतदेहाचा शोध महिनाभरानंतरही सुरुच!

Crime
Crime

चोपडा - चहार्डी (ता. चोपडा) येथील शाळकरी विद्यार्थी मंगेश दगडू पाटील याचा अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याच्या प्रकारातून मातेसह तीन जणांनी मिळून निर्घृणपणे खून केला असल्याची घटना उघडकीस आली आहे. तब्बल महिना उलटूनही मुलाचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागत नसल्याने अडचणी येत आहेत.

चहार्डीला दोन फेब्रुवारीला घरातून गायब झालेल्या मंगेशचा चौथ्या दिवशी खून झाला असल्याचे उघड झाले होते. त्यानंतर घटनेच्या २६व्या दिवसानंतर त्या मुलाच्या आईचे अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून त्याच्या डोक्‍यात लाकडी दांडा मारून घरातच खून केल्याचे स्वतः आरोपींनी तपासाधिकारी पोलिस उपविभागीय अधिकारी सौरभ अग्रवाल यांना सांगितले आहे. त्यानंतर त्या मुलाचा उर्वरित मृतदेह शोधण्यासाठी आरोपी आई गीता दगडू पाटील, राजेंद्र पाटील आणि संभा ऊर्फ समाधान पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्या विद्यार्थ्याचा मृतदेह नेमका कोठे गाडला आहे किंवा फेकला आहे, याचा तपास आरोपींना सोबत घेऊन पोलिस करीत आहेत. आरोपी जसे सांगत आहेत. त्या ठिकाणी पोलिस ‘जेसीबी’ मार्फत खड्डा खोदून शोध घेत आहेत, अशीच माहिती आरोपींनी सांगितल्यानंतर ३ मार्चला शिवाजीनगर भागात नुकताच गिरीश अरुण पाटील या शेतकऱ्याने बांधलेल्या गोठ्याच्या पायामध्ये टाकले असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यानुसार गोठ्याचा पोलिसांनी ‘जेसीबी’द्वारे पाया खोदला. मात्र, तिथेही त्याचा मृतदेह मिळाला नाही. ताब्यातील आरोपी मात्र बेबनाव करत असून ठोस असे काहीही सांगत नसल्याने विद्यार्थ्याचा उर्वरित मृतदेह मात्र मिळालेला नाही.

आज पोलिस कोठडी संपणार
या घटनेसंदर्भात पोलिसांनी ताब्यात घेतलेले आरोपी आई गीता पाटील, राजेंद्र पाटील आणि संभा ऊर्फ समाधान पाटील यांना न्यायालयाने ५ मार्चपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली होती. पाच मार्चला त्यांची पोलिस कोठडी संपत आहे. विद्यार्थ्यांचा उर्वरित मृतदेह पोलिसांना हाती लागत नाही. तोपर्यंत तपासासाठी आरोपींना पोलिस कोठडी मागितली जाईल, असे समजते.

चितेत मृतदेह जाळल्याची चर्चा
चहार्डी येथे ज्या दिवशी या विद्यार्थ्यांचा खून झाला त्याच दिवशी गावातील एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याने त्याचा मृतदेह स्मशानभूमीत जळत होता. त्याच चितेत या मुलाचा मृतदेह आरोपींनी जाळून टाकला असल्याची चर्चा रंगली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com