अत्याचारपीडितेचा गळा आवळून खून

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 नोव्हेंबर 2018

जळगाव - समतानगरातील ८ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून हत्या केल्याप्रकरणात आदेश बाबा ऊर्फ आनंदा साळुंखे या भामट्यावर रामानंदनगर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात खटल्याचे न्यायालयात कामकाज फास्ट्रॅक पद्धतीने सुरू झाले आहे. कामकाजाच्या दुसऱ्या दिवशी बालिकेच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करणारे डॉ. नीलेश देवराज यांची आज न्यायालयात साक्ष नोंदविण्यात आली असून पिडीतेच्या अंगावरील अठरा जखमांसह दोन्ही हाताने गळा आवळून खून झाल्याचे साक्षीत नमूद केले आहे.

समतानगरातील बबली (काल्पनिक नाव) या चिमुरडीवर अत्याचार करून हत्या केल्याप्रकरणी संशयित आनंदा तात्याराव सांळुखे याच्याविरुद्ध दाखल गुन्ह्यात खटल्याचे कामकाज प्रमुख जिल्हा व सत्र न्या. गोविंदा सानप यांच्या न्यायालयात सुरू आहे. खटल्यात कामकाज प्रसंगी आज जिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदन विभागाचे न्यायवैद्यक अधिकारी डॉ. नीलेश देवराज यांची साक्ष व उलटतपासणी नोंदवण्यात आली. साक्षीत डॉ. देवराज म्हणाले की, मृत पिडीतेच्या अंगावर एकूण १८ जखमांसह त्यांचे वर्णन न्यायालयात कथन केले. तिच्यावर अत्याचारानंतर गळा आवळून हत्या करण्यात आल्याच्या अहवालाची माहिती न्यायालयात मांडण्यात आली. तद्‌नंतर डॉ. देवराज यांची बचावपक्षातर्फे ॲड. गोपाळ जळमकर यांनी उलटतपासणी घेताना. पोलिस पंचनामा आणि इतर दस्तऐवजात अपूर्ण असलेल्या काही बाबींचा उलगडा केला. 

१५ पैकी १३ वस्तू ओळखल्या
दाखल गुन्ह्यानंतर तपासाधिकारी उपअधीक्षक सचिन सांगळे यांनी संशयित आदेशबाबाच्या घराच्या पंचनामा करतेवेळी हजर पंचसाक्षीदार मनोज पुरुषोत्तम पाटील यांच्या समक्ष जप्त केलेल्या १५ वस्तू पैकी १३ वस्तूचे वर्णन न्यायालयात सांगून त्या वस्तू ओळखल्या. त्याच सोबत, अत्याचार व हत्येप्रसंगी पीडित बालिकेच्या अंगावरील कपडे पोलिसांनी जप्त केलेले कपडे देखील ओळखले. 

सरकारपक्षातर्फे जिल्हा सरकारी अभियोक्ता ॲड. केतन ढाके, फिर्यादीतर्फे ॲड. एस. के. कौल, बचावपक्षातर्फे विधिसेवा अंतर्गत ॲड. गोपाळ जळमकर, विजय दर्जी कामकाज पाहत आहे.

Web Title: Murder Crime