आतेभावाने केला मामेभावाचा खून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Murder in Dhule Atebhav kill Mamebhava
आतेभावाने केला मामेभावाचा खून

आतेभावाने केला मामेभावाचा खून

सोनगीर : निकुंभे (ता.धुळे) शिवारातील खून प्रकरणी संशयितास पंधरा दिवसांनी अटक करण्यास पोलिसांना यश आले आहे. सख्ख्या आतेभावानेच मामेभावाचा खून केल्याचे यात तपासात निष्पन्न झाले आहे. धुळ्याच्या स्थानिक गुन्हे शाखेने हा खुनाचा गुन्हा उघडकीस आणला. गजानन सजन देवरे (वय ४२, राहणार भोकर) असे संशयिताचे नाव आहे.

हेही वाचा: Chopper Crash : चूक इथं झाली? लवकरच समोर येणार अहवाल

निकुंभेहून निमडाळेकडे (ता. धुळे) जाणाऱ्या कच्च्या रस्त्यालगत १६ डिसेंबर रोजी सकाळी युवकाचा मृतदेह आढळला होता. मयतची युवकाची चार दिवसानंतर सोमवारी (ता. २०) सायंकाळी ओळख पटली. नगाव (ता.धुळे) येथील रहिवासी व सध्या धुळ्यात वडेलवस्त्यावरील साई कॉलनीतील रहिवासी गोरख ऊर्फ गोरक्षनाथ विठ्ठल पाटील (वय ४०) असल्याचे स्पष्ट झाले होते. सोनगीर पोलिस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्यांविरुद्ध खुनाच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. मृत गोरख हे खासगी लक्झरी बसवर चालक होते. पाच सहा दिवसांपासून त्याचा मोबाईल स्वीच ऑफ येत असल्याने विचारपूस सुरू होऊन तो कामाला आलाच नसल्याचे समजले होते. सोनगीर पोलिसांसोबतच स्थानिक गुन्हे शाखेकडून गुन्ह्याचा समांतर तपास सुरू असतांना मयताच्या कौटुंबिक व आर्थिक पार्श्‍वभूमीचा कौशल्यपूर्वक अभ्यास करून तसेच विविध साक्षीदारांकडे केलेल्या चौकशीअंती गजानन देवरे याच्यावर तपासी अधिकाऱ्यांचा संशय बळावला. संशयित देवरे हा एलएलबी करीत असल्याने कायदा व त्यातील पळवाटांचा पुरेपुर वापर करीत होता. स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी यांनी संशयिताचे वर्तन व दिलेल्या उत्तरांचे विश्लेषणकरीत संशयित देवरेला ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

हेही वाचा: नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा तब्बल ४९ दिवसानंतर मृत्यू...

आर्थिक व्यवहारातून खून

मयत गोरख पाटील हा व संशयित गजानन देवरे याचा मामेभाऊ होता. जवळचे नाते असल्याने त्यांच्यात नेहमी आर्थिक व्यवहार होत असे. देवरेचा दुधाचा व्यवसाय आहे. संशयित देवरे हा मयत पाटीलला दूध व उसनवार पैसे देत असे. त्यातून पैशांची उधारी सुमारे चार लाखापर्यंत वाढत गेली. संशयिताने मयताकडे उसनवार पैशाचा तगादा लावला. १५ डिसेंबरला चिचगाव-ढंडाणेहून धुळ्याला मोटार सायकलने येत असतांना त्यांचा पैशांच्या व्यवहारावरुन वाद झाले. संशयिताने तीक्ष्ण हत्यार व दगडाने गोरख पाटीलला जीवे ठार मारले. मयताची ओळख पटणार नाही अशा अवस्थेत सोडून घरी आला. मयताच्या अंत्यविधीसह सर्व कार्यक्रमात हजर राहत असल्याने कोणासही संशय आला नाही.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top