Dhule Crime News : पैशाच्या वादातून मित्राचा खून

murder
murderesakal
Updated on

Dhule Crime News : नरडाणा (ता. शिंदखेडा) येथे पैशांच्या वादातून तसेच जखमी केल्याचा बदला म्हणून एकाचा खून झाल्याची घटना बुधवारी (ता. ५) सायंकाळी घडली. दोन्ही एकमेकांचे मित्रच असल्याचे समजते. या प्रकरणी नरडाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, संशयिताला अटक झाली आहे. (Murder of a friend due to money dispute dhule crime news)

बुधवारी दुपारी गजराज सोमनाथ लिंगायत व त्याचा मित्र विशाल दगडू नेतले (दोघे रा. भिलवस्ती, नरडाणा) यांच्यात दुपारी दोनच्या सुमारास पैसे देण्या-घेण्यावरून वाद झाला. वाद विकोपाला गेल्याने गजराजने विशालच्या डाव्या डोळ्यावर वस्तू मारून फेकल्याने तो जखमी झाला.

गजराज घरी आल्यावर झोपला असता सायंकाळी साडेपाचच्या सुमारास विशाल नेतले त्याच्या घरी आला. विशालने जमिनीवर झोपलेल्या गजराजवर लोखंडी सुऱ्याने पोटावर व छातीवर सपासप वार करून गजराजला जबर जखमी केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

murder
Dhule Crime News : 6 लाखांची प्रतिबंधित सुगंधित सुपारी पकडली; सोनगीर पोलिसांची कारवाई

जखमी गजराजला वाचविण्यासाठी त्याचा लहान भाऊ नकुल लिंगायतने प्रयत्न केले. तेव्हा विशाल तेथून पळून गेला व सरळ नरडाणा पोलिस ठाण्यात हजर झाला. गंभीर जखमी गजराजला प्रथम नरडाणा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.

मात्र त्याची गंभीर अवस्था पाहून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी धुळ्यातील शासकीय रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. उपचारादरम्यान तो गुरुवारी (ता. ६) सकाळी दगावला. नकुल लिंगायतने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला असून, संशयित विशाल नेतले यास अटक करण्यात आली आहे.

murder
Dhule Crime News : पत्नीचे दात पाडून, हात मोडून तिला केले ठार मग पतीची आत्महत्या... कुंडाणेमध्ये संशयास्पद घटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com