प्रेमसंबंधाच्या संशयातून मंगरूळला तरुणाचा खून

Murder
Murder

पारोळा - मंगरूळ (ता. पारोळा) येथे नातेवाइकांमध्ये प्रेमसंबंधाच्या संशयातून एका गटाने दुसऱ्या गटाच्या तरुणाला लाकडी दांड्याने मारहाण केली. यात तो जागीच ठार झाला. ही घटना आज सकाळी अकराच्या सुमारास घडली. याबाबत तीन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. 

मंगरूळ येथील कैलास श्रीकृष्ण पाटील (वय ३८) याचे संशयितांच्या गटामधील एका महिलेसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. १० ऑक्‍टोबरला कैलास पाटील हा न्यायालयीन कामकाजासाठी भडगाव येथे गेला होता. तो १६ ऑक्‍टोबरपर्यंत घरी परतला नव्हता. याच काळात संशयित गटातील एक मुलगी ही देखील घरातून बेपत्ता झाली होती. ती त्याच्या सोबतच गेली होती असा संशय संबंधितांना होता.

दरम्यान, संशयितातील गणेश पाटील हा आज कैलास पाटील यांच्या घरी येऊन त्याच्या वडिलांकडून आम्ही दिलेले पाइप परत मागत होता. कैलासचे वडील ते पाइप गोडाऊनमधून काढून देत असताना कैलास तेथे आला कैलास ते पाइप काढून देत असताना त्याचे वडील घरात गेले. त्यानंतर काही वेळातच कैलासचा जोरजोरात आवाज आला. त्याचे वडील आल्यावर संशयित युवराज ऊर्फ भाऊसाहेब माधवराव पाटील, सूर्यभान माधवराव पाटील, गणेश माधवराव पाटील हे त्याला लाकडी दांड्याने डोक्‍यावर, पाठीवर व पायावर मारहाण करीत होते. तसेच मारहाण करून कैलासला ओढून घेऊन जात त्याच्या अंगणाजवळ पुन्हा मारहाण केली. कैलासचे वडील, मुलगी हिने संशयितांना मारहाण करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला.

यावेळी पारोळा पोलिस ठाण्यात मुलीने फोन केल्याने पोलिस तेथे दाखल झाले. जखमी अवस्थेतील कैलासला रुग्णवाहिकेतून कुटीर रुग्णालयात दाखल केले असता तपासणीअंती वैद्यकीय अधिकारी कैलासला मृत घोषित केले. याबाबत श्रीकृष्ण पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला. सायंकाळपर्यंत पोलिस उपनिरीक्षक अजितसिंग देवरे, हवालदार पंकज राठोड आदींनी नातेवाइकांना विश्‍वासात घेऊन संशयित आरोपी युवराज पाटील, सूर्यभान माधवराव पाटील  गणेश माधवराव पाटील या तिघांना शिताफीने अटक केली. या प्रेमसंबंधासंदर्भात एक व्हिडिओ क्‍लीप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. या बदनामीचाही रोष या घटनेमागे असल्याची चर्चा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com