शाहुनगरात पोलिस लाइन समोर तरुणाला भोसकले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 मार्च 2017

जळगाव - खॉजामिया रोडवरील शाहू महाराज कॉम्पलेक्‍सजवळ कृष्णा हॉस्पिटल समोर आज सकाळी साडेअकराच्या सुमारास दहा ते पंधरा गुंडांनी तरुणावर हल्ला चढवला. पोलिस कर्मचारी निवासस्थानासमोर हा थरार सुरू असताना जखमीच्या मदतीला कोणीही आले नाही. मारहाणीत एकाने धारदार चॉपर पोटात खुपसल्यावर तरुण कोसळला. त्यानंतर हल्लेखोरांनी दुचाकीवर पळ काढला. जिल्होपठ पोलिसांत या प्रकरणी करण्यात आली आहे. जखमी तरुणावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

जळगाव - खॉजामिया रोडवरील शाहू महाराज कॉम्पलेक्‍सजवळ कृष्णा हॉस्पिटल समोर आज सकाळी साडेअकराच्या सुमारास दहा ते पंधरा गुंडांनी तरुणावर हल्ला चढवला. पोलिस कर्मचारी निवासस्थानासमोर हा थरार सुरू असताना जखमीच्या मदतीला कोणीही आले नाही. मारहाणीत एकाने धारदार चॉपर पोटात खुपसल्यावर तरुण कोसळला. त्यानंतर हल्लेखोरांनी दुचाकीवर पळ काढला. जिल्होपठ पोलिसांत या प्रकरणी करण्यात आली आहे. जखमी तरुणावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

जुना खेडी रोड सदाशिव नगरातील रहिवासी खगेश दिलीप कोल्हे (वय-१९) हा तरुण पुणे येथे हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेत आहे. होळी व परीक्षेपूर्वी महाविद्यालयाला सुटी असल्याने तो जळगावात काही दिवसांपूर्वी घरी आला. सोमवारी (ता.१३) मार्चला खगेश मित्रांसोबत रथचौकात धुळवड खेळण्यासाठी आला होता, त्यावेळी जैनाबादच्या ८ ते १० गुंडाच्या टोळीने तेव्हा उपस्थित इतर तरुणांना त्यांना हवा असलेल्या एका मुलाची माहिती विचारली, यावेळी खगेश सोबतच्या एकाने ‘काय..? झाले’ असा प्रतिप्रश्‍न केल्याने त्याच्यावर ही टोळी तुटून पडली, त्यांना मारहाण करीत तेथून पळ काढला. मारहाण झालेल्या तरुणाचे मित्र तेथे पोचल्यावर त्यांना प्रकार कळला, उलट प्रश्‍न केला म्हणून मारणारा..कोण यासाठी त्यावेळी धुळवड थांबवून जैनाबादच्या त्या पोरांचा शोध घेतला. ते मिळून आले नाही म्हणून तेव्हाच पडदा पडला. आज मात्र त्याच टोळीने भरदिवसा खगेश कोल्हेवर प्राणघातक हल्ला चढवून त्याला जखमी केले.  

टोळीचा हल्ला..
सुटी संपत आल्याने खगेश कोल्हे आज रात्रीच्या गाडीने पुण्याला जाणार होता. तत्पूर्वी आज सकाळी बाजारात खरेदी आणि पूर्वी काम करीत असलेल्या कृष्णा हॉस्पिटल येथे जाऊन येतो असे सांगून घरातून सकाळी अकराच्या सुमारास निघाला होता. त्याचा मित्र संजयसह हॉस्पिटलसमोर झाडा खाली गप्पा मारत असताना ‘जैनाबाद गॅंग’चे गुंड ट्रिपलसीट ४ मोटारसायकलीवरून येऊन धडकले. काहीही न बोलता त्यांनी खगेश कोल्हेवर हल्ला चढवला. रस्त्यावरून येणाऱ्या जाणारेही थांबले. एकाने खगेशच्या पोटात धारदार चॉपर खुपसल्यावर खगेशने चॉपर धरला, पुन्हा दुसरा वार होऊन रक्तस्राव होऊन तो कोसळला. 

रुग्णालयात उपचार
चॉपरने हल्ला झाल्याचे अनेकांनी पाहिले मात्र, खगेश जखमी झाल्यावर त्याच्या मदतीला कुणी आले नाही. दुचाकीवरून जात असलेल्या तरुणाने खगेशला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार करत कुटुंबीयांना घटनेबाबत माहिती दिली. काही वेळातच खगेशच्या आई-वडिलांनी तसेच मित्र मंडळींनी जिल्हा रुग्णालय गाठले. खगेश याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. 

पोलिसांचे ‘ना भय, ना भीती’
शहरातून पोलिस यंत्रणेची भीती केव्हाच गुन्हेगारांच्या स्मृतीतुन पुसली गेली आहे. भर दिवसा चोऱ्या घरफोड्यांच्या घटना नित्यनेमाच्या झाल्या आहेत. पोलिस लाइनसमोरच दिवसा आज झालेला हा हल्ला पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह लावणारा आहे. पोलिस लाइनीत घरी एक-दोन पोलिस होतेही, मात्र नको कटकट म्हणून त्यांनीही माना फिरवल्याचे सांगितले जात आहे. खगेशवर चॉपरने हल्ला करणाऱ्यांमध्ये धीरज कोळी, साई नावाचा एक तरुण व त्यांच्या सोबत ट्रिपलसीट ४ दुचाक्‍यांवर जैनाबाद टोळी आल्याचे खगेशने पोलिस जबाबात सांगितले आहे.

जैनाबाद गॅंगचा उच्छाद 
शहरातील विस्तारित प्रभाग जुना खेडी रोड वरील सदाशिव नगरात, जुने जळगाव-जैनाबाद परिसरातील गुंड तरुणांचा उपद्रव वाढला आहे. खगेशला मारहाण करणाऱ्या टोळीने गेल्या महिन्या भरात खेडी गावाला लागून असलेल्या रहिवासी वस्त्यांमध्ये अनेक तरुणांना बदडून काढत दहशत माजवली आहे. ट्रिपलसीट दुचाकीवरून या भागात मोटारसायकली पिटून मुलींच्या छेडखानीच्याही घटना यापूर्वी घडल्याचे परिसरातील नागरिकांनी शनिपेठ पोलिसांत कळवले आहे.

Web Title: murderer attack on youth