क्रिकेटच्या वादातून तरुणावर चाकूहल्ला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 मे 2017

महामार्गालगत घडली घटना; पोटात चार वेळा भोसकला चाकू 

जळगाव - क्रिकेट स्पर्धेच्या वादातून शहरातील अंजिठा चौफुलीजवळी महामार्गालगत असलेल्या रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ आज तरुणावर चाकूहल्ला झाल्याची घटना घडली. ही घटना सकाळी अकराच्या सुमारास घडल्याने परिसरात खळबळ उडाली. पोटात चार वेळा चाकू भोसकल्याने तरुण गंभीर जखमी झाला आहे. जिल्हा रुग्णालयात जखमीला उपचार सुरू आहे.  

महामार्गालगत घडली घटना; पोटात चार वेळा भोसकला चाकू 

जळगाव - क्रिकेट स्पर्धेच्या वादातून शहरातील अंजिठा चौफुलीजवळी महामार्गालगत असलेल्या रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ आज तरुणावर चाकूहल्ला झाल्याची घटना घडली. ही घटना सकाळी अकराच्या सुमारास घडल्याने परिसरात खळबळ उडाली. पोटात चार वेळा चाकू भोसकल्याने तरुण गंभीर जखमी झाला आहे. जिल्हा रुग्णालयात जखमीला उपचार सुरू आहे.  

मेहरूण परिसरातील गुरूदत्तनगरतील रहिवासी फिरोज खान नईम खान (वय ३८) हे बांधकाम मजुरीचे काम करतात. फिरोज खान यांनी ८ ते ११ एप्रिल दरम्यान रायसोनी नगरात मौलाना अब्दूल कलाम आझाद वेल्फेअर एज्युकेशनतर्फे क्रिकेटची स्पर्धा भरवली होती. स्पर्धेत तांबापुरा संघ व आयोजक फिरोज यांचा संघ हे अंतिम सामन्यासाठी पात्र ठरला होते. परंतु काही कारणास्तव अंतिम सामना होऊ शकला नाही. यामुळे फिरोज खान व तांबापुरा संघाचे खलिल उस्मान यांच्यात वीस दिवसापूर्वी अंतिम सामना का होत नाही यावरून वाद झाला होता. त्यात आज फिरोज खान जोशी वाडा येथे बांधकामाच्या साइटवर जाण्यासाठी कामगारांसोबत इतर कामगारांची वाट रिलायन्स पेट्रोल पंप येथे पाहत होता. यावेळी खलिल उस्मान हा सात ते आठ जणांनी टोळी घेऊन फिरोज खानला स्पर्धेचे बक्षिसाचे ५१ हजार रुपये आताच दे असा तगादा लावला. फिरोज यांनी अंतिम सामना झाला नसून पैसे कसे देवू, सांगताच खलिल व त्याच्यासोबत आलेल्या तरुणांनी फिरोज याला बेदम मारहाण करून पोटात चाकू भोसकला. चार वेळा चाकू भोसकल्याने फिरोज हा गंभीर जखमी झाला. त्याच्याजवळ असलेले ३१ हजार रुपये हल्लेखोरांनी हिसकावून तेथून पळ काढला. यानंतर अफसर शेख, आसिफ शेख, जाकीर ठेकेदार, विठ्ठलभाऊ यांनी फिरोजला रक्तबंबाळ अवस्थेत  जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात जखमी तरुणाचे जबाब नोंदवून घेतले आहे.  या प्रकरणी खलिल उस्मान शेख व हमीद ऊर्फ पहिलवान उस्मान शेख या दोघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
 

क्रिकेट स्पर्धा भरविणे पडली महागात
फिरोज खान याने रायसोनी नगरात क्रिकेट स्पर्धेचे एप्रिल महिन्यात आयोजन केले होते. स्पर्धेत ३२ संघानी सहभाग घेतला होता. स्पर्धेतील विजेत्याला ५१ हजारांचे तर उपविजेत्यास ३१ हजारांचे बक्षीस ठेवण्यात आले होते. परंतु स्पर्धेचा अंतिम सामना काही कारणास्तव झाला नाही. त्यामुळे स्पर्धेचे बक्षीस रक्कमेवरून फिरोज व खलिल यांच्या झालेल्या वादातून आज फिरोजवर चाकूहल्ला झाला.

Web Title: murderer attack on youth