मुस्लिम समाजाचे जलसमाधी आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

नाशिक - मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीतर्फे गोदावरी पात्रात बुधवारी (ता. 15) जलसमाधी आंदोलन केले.

नाशिक - मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीतर्फे गोदावरी पात्रात बुधवारी (ता. 15) जलसमाधी आंदोलन केले.

मुस्लिम समाजाला शिक्षण व रोजगारात पाच टक्के आरक्षणाची मागणी करण्यात आली. उच्च न्यायालयाने 2014 मध्ये मुस्लिम समाजास शिक्षणात पाच टक्के आरक्षण मान्य केले होते. सरकारने याकडे दुर्लक्ष केल्याने समाज अद्याप आरक्षणापासून वंचित आहे. अनेक आंदोलने करूनही सरकारला जाग आली नाही. त्यांना जाग येण्यासाठी मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीतर्फे प्रदेशाध्यक्ष अजीज पठाण यांच्या नेतृत्वाखाली काल टाळकुटेश्‍वर नदीपात्रात दुपारी बाराच्या सुमारास आंदोलनकर्त्यांनी नदीपात्रात उड्या घेतल्या. गोदापात्र परिसरातील सुरक्षारक्षकांच्या मदतीने पोलिसांनी आठ आंदोलकांना ताब्यात घेतले. आंदोलनासाठी पोलिसांनी परवानगी दिली नसल्याची माहिती पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली.

Web Title: Muslim Society Agitation